Home Cities जळगाव जळगावात प्रभाग ८ मध्ये आ. भोळे यांची प्रचार रॅली

जळगावात प्रभाग ८ मध्ये आ. भोळे यांची प्रचार रॅली

0
102

rajumama

जळगाव, प्रतिनिधी | जळगाव शहर प्रभाग क्र.८ मध्ये महायुतीचे उमेदवार आ. सुरेश   भोळे यांची  आज शुक्रवार दि. ११ ऑक्टोंबर रोजीचा प्रचार रॅली काढण्यात आली.

महायुतीचे उमेदवार आ. सुरेश भोळे यांचा प्रचार दौरा आज शुक्रवार दि.११ ऑक्टोबर रोजी प्रभाग क्र.८ मध्ये काढण्यात आला होता. या प्रचार रॅलीस सकाळी ८:०० वाजता ,नगरसेविका लता भोईटे यांच्या निवासस्थानापासून भोईटे नगर, घोरपडे चक्की यश लॉन –भिकमचंद नगर -वाघूळदे नगर , –प्रेमनगर –स.म.ई.ट.स्वामी क्लासेस स्वामी समर्थ केंद्र –चौधरी वाडा-आसाराम बापू आश्रम- गुजराल पेट्रोल पंप मागील बाजू अग्रवाल प्रोव्हीजन -४० खोल्या ,श्रीराम नगर विश्राम नगर,विठ्ठल वाडी या भागात रॅली काढण्यात आली होती. याप्रसंगी प्रभाग समिती सभापती नगरसेवक डॉ.चंद्रशेखर पाटील , नगरसेविका प्रतिभा पाटील, नगरसेविका प्रतिभा देशमुख, संघटन सरचिटणीस विशाल त्रिपाठी, मंडळ अध्यक्ष शक्ती महाजन, महेश ठाकूर ,नाग्रेन्द्र मगदूम, रघुनाथ वाघ, इंद्रराव पाटील, कुलकर्णी महाराज, महिला आघाडी च्या रेखा कुलकर्णी,राहुल लोखंडे, रिंकू चौधरी, मयूर मगदूम ,नितीन जाधव, आशिष पाटील, पितांबर कोळी,आदी प्रमुख कार्यकर्ते ,पदाधिकारी उपस्थित होते.समारोप खोटेनगर येथे करण्यात झाला.


Protected Content

Play sound