Home क्राईम धरणगावात रथोत्सवाचा गैरफायदा घेत अज्ञात चोरट्यांकडून सोनसाखळी लंपास

धरणगावात रथोत्सवाचा गैरफायदा घेत अज्ञात चोरट्यांकडून सोनसाखळी लंपास


धरणगाव प्रतिनिधी । आज धरणगावातील रथोत्सवातील गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी एका घरात घुसून महिलेला मारहाण करून सोनसाखळी चोरून नेल्याची घटना रात्री नऊ वाजेच्या सुमारास घडली.

येथील एकादशीच्या निमित्ताने रथोत्सव सुरू होता त्याचा फायदा घेत जैन गल्ली महाराष्ट्र बँक परिसरात 9 वाजेच्या सुमारास घरात घुसून सोनसाखळी व काही कानातले रिंग अज्ञात चार चोरट्यांनी लंपास केले. जैन गल्लीतील अजित डहाळे सर यांच्या पत्नीच्या कानातील सोने सोनसाखळी चोरट्यांनी लंपास केले. त्याचबरोबर त्यांना मारहाण करत बेशुद्ध केले. घटनास्थळी पोलिसांनी धाव ही घटना ज्या वेळेस अजित दहाडे घरी आले त्यावेळेस त्यांची पत्नी बेशुद्धावस्थेत पडलेली दिसून आले. हा सीसीटीव्ही मध्ये घटना कैद झाली असून याप्रकरणी धरणगाव पोलीस कर्मचारी तपास घेत आहे.


Protected Content

Play sound