नागपूर, वृत्तसंस्था | मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शुक्रवारी सकाळी १० वाजता नागपूर दक्षिण पश्चिम विधानसभा मतदारसंघात निवडणूक अर्ज दाखल करतील, अशी माहिती भारतीय जनता पार्टीचे प्रदेश सहमुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी दिली.
केशव उपाध्ये यांनी सांगितले की, मुख्यमंत्री निवडणूक अर्ज दाखल करतील त्यावेळी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, भाजपा राष्ट्रीय सरचिटणीस व प्रदेश निवडणूक प्रभारी भूपेंद्र यादव आणि भाजपा राष्ट्रीय सरचिटणीस व प्रदेश प्रभारी सरोज पांडे उपस्थित राहणार आहेत. सकाळी १० वाजता मिरवणूक निघेल व अकरा वाजता मुख्यमंत्री निवडणूक अर्ज दाखल करतील.