जळगाव, प्रतिनिधी | भाजपचे जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते आणि सध्या पक्षाकडून तिकीट न मिळाल्याने नाराज असलेले एकनाथराव खडसे यांना आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आणण्याचे जोरदार प्रयत्न सुरु झाले असून त्यांना रा.कॉ.चे तिकीट देण्यासाठी त्यांचे मन वळवावे म्हणून माजी उपमुख्यमंत्री व रा.कॉ.चे नेते अजित पवार स्वत: मुक्ताईनगरकडे रवाना झाले आहेत.
आताच अजित पवार बीड येथील आपला नियोजित दौरा रद्द करून मुक्ताईनगरकडे निघाले आहेत. त्यांच्यासोबत खडसे यांच्यासाठी ए.बी. फॉर्म असल्याचीही चर्चा आहे. थोड्याच वेळात ते मुक्ताईनगरात दाखल होणार असून त्यांच्या उपस्थितीत एकनाथराव खडसे काय निर्णय घेतात ? ते स्पष्ट होणार आहे.