Home क्राईम विवर्‍याजवळ बसला अपघात; चालक जखमी

विवर्‍याजवळ बसला अपघात; चालक जखमी

0
77

रावेर प्रतिनिधी । आज पहाटे साडेतीन वाजेच्या सुमारास खड्डा चुकवण्याच्या प्रयत्नात विवरे गावाजवळ भरधाव ट्रक बसवर धडकल्याने अपघात झाला असून यात चालक जखमी झाले आहेत.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, रावेर आगाराची संगमनेर-रावेर बस (एम.एच.४०-९०३८) ही परतीच्या प्रवासात रावेर येत असताना विवरे-रावेरदरम्यान समोरून येणार्‍या भरधाव ट्रकने खड्डा चुकवण्याच्या प्रयत्नात बसला जोरदार धडक दिल्याने बसच्या दर्शनी भागाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. यात बस चालक आर.एच.आशिरवाड गंभीर जखमी झाल्याने त्यांना जळगावात हलवण्यात आले. बसमधील प्रवाशांना सुदैवाने इजा झाली नाही. मात्र वाहक राठोडसह एका प्रवाशाला किरकोळ मुका मार लागल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, रावेर मार्गावर अपघाताची मालिका सातत्याने सुरू असून खड्डे बुजवणार कधी? असा प्रश्‍न संतप्त वाहनधारक उपस्थित करीत आहेत.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound