thunders
धरणगाव

भंवरखेडे येथे वीज कोसळून पाच जण ठार

शेअर करा !

thunders

बोरगाव ता. धरणगाव (प्रतिनिधी) येथून जवळच असलेल्या भंवरखेडे येथे वीज पडून एकाच परिवारातील चार जणांसह एक महिला असे एकूण पाच जण ठार झाल्याची घटना आज दुपारी घडली आहे.

kirana

 

या संदर्भात अधिक असे कि, आज दुपारी १ वाजेच्या भंवरखेडे गावातील रघुनाथ दशरथ पाटील (वय ५०) हे आपली पत्नी अलका रघुनाथ पाटील (वय ४५), सून लता उदय पाटील (वय ३५), दुसरी सून शोभा भागवत पाटील (वय ४०) व गावातील रोजंदारीवरील महिला कल्पना भैय्या पाटील (वय३५) यांच्यासह ज्वारी काढण्यासाठी शेतात गेले होते. त्याचवेळी नेमका परिसरात विजेच्या गडगडासह मुसळधार पावसाला सुरुवात झाली. यावेळी सर्व कुटुंब शेतातील एका झाडा खाली आश्रयासाठी थांबले. परंतू तेवढ्यात अचानक एक वीज झाडावर कोसळली. त्यात पाचही जणांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे गावावर शोककळा पसरली आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच धरणगाव येथून प्रशासकीय यंत्रणा भंवरखेडे येथे येण्यासाठी रवाना झाली असल्याचे कळते.