Home Cities भुसावळ भुसावळसाठी राष्ट्रवादीतर्फे सतीश घुले यांच्या नावाची घोषणा (व्हिडिओ)

भुसावळसाठी राष्ट्रवादीतर्फे सतीश घुले यांच्या नावाची घोषणा (व्हिडिओ)

0
149

WhatsApp Image 2019 09 19 at 4.01.55 PM

 

भुसावळ, प्रतिनिधी | आगामी विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे उमेदवार सतीश घुले असतील अशी घोषणा माजी आ. संतोष चौधरी, जिल्हाध्यक्ष ऍड. रवींद्र पाटील यांनी दि.१८ रोजी येथील तेली मंगल कार्यालयात आयोजित कार्यकर्त्यांच्या मेळाव्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत जाहीर केली.

याप्रसंगी समाजिक न्याय विभागाचे अरविंद मानकारी, ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष उमेश नेमाडे, तालुकाध्यक्ष सतीश घुले, महिला तालुकाध्यक्ष मयुरी पाटील, युवा जिल्हाध्यक्ष ललीत बागुल, गटनेता कृउबा सभापती सचिन चौधरी, उल्हास पगारे, शहराध्यक्ष नितीन धांडे, शेतकी संघ चेअरमन पंढरी पाटील, गजानन सरोदे उपस्थित होते. ते म्हणाले की, संपूर्ण ताकदीनिशी पक्षाचे उमेदवार सतीष घुले यांना निवडून आणले जाईल. यासाठी शहर व तालुक्यातील कार्यकर्ते पदाधिकर्‍यांचे मेळाव्यातून चर्चा केली जात असल्याचे माजी आ. संतोष चौधरी यांनी सांगितले. शहरातील साई मंदीर ट्रस्टच्या माध्यमातून शहरातील गडकरी नगरातील एक एकर जागेत तालुक्यातील गरिब व गरजुंसाठी अद्ययावत हॉस्पीटल तयार करण्यात येईल. ऍम्बुलन्स, दोन  टँकर घेण्यात येणार आहे. शिवाय ट्रस्टच्या माध्यमातून तालुक्यतील एक हजार मुला, मुलींच्या १ली ते दहावीपर्यंत मोफत शिक्षण, गणेवेश, साहित्याची सोय करण्यात येणार असल्याचे माजी आ. चौधरी यांनी सांगितले.  जिल्हाध्यक्ष ऍड. रवींद्र पाटील यांनी तालुक्यासह जिल्ह्यातील रस्त्यांची परिस्थिती बकाल झाली आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र, पशुवैद्यकिय दवाखान्यांमध्ये डॉक्टर्स नाही. ही परिस्थिती बदलण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस पुढे येत असल्याचे सांगितले. सतीश घुले यांनी, पक्षाच्या नेत्यांनी आपल्याला आशिर्वाद दिले आहे. काम करुन दाखवून उत्तर देवू असे सांगितले.


Protected Content

Play sound