नवी दिल्ली वृत्तसंस्था । संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनास आजपासून प्रारंभ झाला असून यात उद्या अर्थसंकल्प मांडला जाणार आहे.
केंद्रातील मोदी सरकारचे हे शेवटचे संसदीय अधिवेशन असणार आहे. अर्थात, या सरकारचा हा शेवटचा अर्थसंकल्प असल्यामुळे यात अनेक लोकप्रिय घोषणा होण्याची शक्यता आहे. या अनुषंगाने अर्थसंकल्पाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तर शेवटच्या अधिवेशनात मोदी सरकारला घेरण्यासाठी विरोधकांनी एकजुटीची वज्रमूठ आवळण्याची तयारीदेखील सुरू केली आहे. अलीकडच्या काळात विरोधकांमध्ये मोठ्या प्रमाणात ऐक्य वाढीस लागले असून याचे प्रतिबिंब या अधिवेशनात दिसणार असल्याचे मानले जात आहे.