भारत पुन्हा करणार इस्राईलकडून ‘त्या’ बॉम्बची खरेदी

spice rafael

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) २६ फेब्रुवारीला भारतीय हवाई दलाच्या १२ मिराज २००० विमानांनी बालाकोटवर हल्ला चढवला होता. यादरम्यान हवाई दलानं एअर स्ट्राइक वेळी वापरलेल्या स्पाईस २००० बॉम्बची एकदा पून्हा इस्राईलकडून त्यांची खरेदी करण्यात येणार आहे. त्यावेळी हवाई दलानं स्पाईस २००० बॉम्बचा वापर करत, अचूक निशाणा साधत दहशतवादी तळ उद्ध्वस्त करण्यात आले होते.

 

ताफ्यातील शस्त्र आणखी अत्याधुनिक करण्यासाठी हवाई दलाकडून स्पाईस २००० बॉम्बची खरेदी करण्यात येणार आहे. कोणत्याही इमारतीला उद्ध्वस्त करण्यासाठी योजनाबद्ध पद्धतीनं या बॉम्बचा वापर करता येतो. या बॉम्बच्या आधीच्या व्हर्जनमध्ये इमारतीला भेदण्याची आणि त्यानंतर इमारतीत स्फोट घडवण्याची क्षमता होती. बालाकोटच्या एअर स्ट्राईकमध्ये स्पाईस २००० बॉम्बनं महत्त्वाची भूमिका बजावली होती. जैश-ए-मोहम्मदचे तळ उद्ध्वस्त करण्याची कामगिरी स्पाईस २००० ने यशस्वीरित्या पार पाडली होती. या बॉम्बनं बालाकोटमधील दहशतवाद्यांची प्रशिक्षणासाठी वापरली जाणारी इमारत उद्ध्वस्त केली. स्पाईट २००० ने दहशतवाद्यांच्या इमारतीला भगदाड पाडले. त्यानंतर बालाकोट येथे मोठया धमाक्यात पूर्ण इमारत नष्ट झाली होती.

Add Comment

Protected Content