Home Cities यावल भाजप पक्ष नव्हे तर परिवार – ना. मुनगंटीवार (व्हिडीओ)

भाजप पक्ष नव्हे तर परिवार – ना. मुनगंटीवार (व्हिडीओ)

0
27

savda melava 1

सावदा, प्रतिनिधी | “या देशात २६०० हून अधिक नोंदणीकृत पक्ष आहेत. बाकीचे बरेच पक्ष हे एखाद्या नेत्याच्या परिवाराची खाजगी संपत्ती आहेत पण फक्त भाजप हा पक्षच भारतीय जनतेचा परिवार आहे.” असे प्रतिपादन राज्याचे अर्थमंत्री ना.सुधीर मुनगंटीवार यांनी आज येथे भाजपच्या मेळाव्यात केले. ते पुढे म्हणाले की, “इतर अनेक पक्षात वेगवेगळ्या जातीचे किंवा धर्माचे कार्यकर्ते आहेत पण फक्त याच पक्षात कार्यकर्त्यांची एकच जात आहे, ती म्हणजे भारतीय जनता पक्ष”.

 

येथील जेहरा मंगल कार्यालयात भारतीय जनता पक्षाच्या मेळाव्यास दुपारी प्रारंभ झाला. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून अर्थमंत्री ना. सुधीर मुनगंटीवार, माजी केंद्रीय मंत्री खासदार सुभाष भामरे, माजी मंत्री आ. एकनाथराव खडसे, महाराष्ट्र राज्य कृषी शिक्षण, कृषी विस्तार व संशोधन परिषदेचे उपाध्यक्ष ना. हरीभाऊ जावळे, रावेरच्या खासदार रक्षाताई खडसे, प्रदेश उपाध्यक्ष अशोक कांडेलकर, ‘बेटी बचाव बेटी पढाव’चे राष्ट्रीय संयोजक राजेंद्र फडके आदी मान्यवरांची उपस्थिती होती.

या कार्यक्रमात महाराष्ट्र राज्य कृषी शिक्षण, कृषी विस्तार व संशोधन परिषदेचे उपाध्यक्ष ना. हरीभाऊ जावळे यांच्या कार्याचा वृत्तांत असणार्‍या बांधिलकी पुस्तीकेचे प्रकाशन ना. मुनगंटीवार यांच्याहस्ते करण्यात आले. या मेळाव्यास पक्षाचे शक्ती केंद्रप्रमुख, शाखाध्यक्ष, बूथ प्रमुख, बुथ समिती, पेज प्रमुख गण, प्रमुख, गटप्रमुख, लोकप्रतिनिधी, पदाधिकारी कार्यकर्ते तसेच आघाड्यांचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सरचिटणीस व कार्यकर्ते उपस्थित होते.

 

 


Protected Content

Play sound