जामनेर (प्रतिनिधी) यावर्षी वरूण राजांची कृपादृष्टी चांगली असल्यामुळे सर्वच बंधारे व नद्या- नाले तुंडूब भरून ओसांडून वाहत आहेत. त्या बरोबरच अनेक ठिकाणी नवीन वीज केंद्रांची उभारणी सुध्दा केलेली असल्याने शेतकऱ्यांना आता वीज व पाणी मुबलक प्रमाणात उपलब्ध होणार,असे प्रतिपादन पालकमंत्री ना.गिरीष महाजन यांनी केले. ते केकतनिंभोरा येथे पंडित दीनदयाल उपाध्याय ग्रामज्योती योजने अंतर्गत बांधलेल्या ३३/११ के.व्ही.उपकेंद्राच्या उदघाटन प्रसंगी बोलत होते.
यावेळी ना.महाजन म्हणाले की, गल्ली ते दिल्ली पर्यंत आपलीच सत्ता असल्याने तालुक्याच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध असून त्या निधीच्या माध्यमातून पाणी आडवा पाणी जिरवा योजनेतून तालुकाभरात अनेक नवीन बंधारे बांधले आहेत. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष दिलीप खोडपे,भाजपाचे तालुकाध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर,पंचायत समितीच्या सभापती निता पाटील, गटनेते अमर पाटील,नगरपालिकेच्या गटनेते डॉ.प्रशांत भोंडे,तुकाराम निकम,कमलाकर पाटील,मधुकर पंडित ,बाबुराव गवळी,पोलीस पाटील गोरखनाथ बहिरे, ईश्र्वर भोंडे,रंगनाथ पाटील,राजेंद्र चौधरी महावितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता प्रदीप घोरुंडे,कार्यकारी अभियंता करेरा,सहाय्यक अभियंता बाविस्कर, सहाय्यक अभियंता देशमुख,भुसावळ येथील चौधरी तसेच केकतनिंभोरा कक्षाचे कनिष्ठ अभियंता महेशकुमार महाजन,बांधकाम ठेकेदार वाणी यांच्यासह वितरण कंपनीचे अधिकारी,कर्मचारी, ग्रामपंचायतीचे पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.