जळगाव प्रतिनिधी । शहरातील एमआयडीसी पोलीस हद्दीत चार ठिकाणी घरफोडी करून मुद्देमाल लंपास केल्याप्रकरणातील दोन दरोडेखोरांना अटक करण्यात एलसीबीच्या पथकाला यश आले. त्यांच्या ताब्यातील 3 लाख 74 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
जळगाव शहरातील दाखल घरफोडयाच्या घटनास्थळावरुन जळगाव शहरातील अट्टल घरफोडी करणारा संशयित राजेंद्र उर्फ सोप्याराज्या दत्तात्रय गुरव (वय-30) रा.वाघनगर, साईसंसार कॉलनी, जळगाव ह.मु.परदेशीपुरा इंदौर (मध्यप्रदेश) याला इंदौर येथून ताब्यात घेतले. त्यांची कसून चौकशी केली असता त्याचा साथीदार अजय उर्फ शाहरुख हिरालाल पाटील (वय 24) रा.नांद्रा कानळदा, ता.जि.जळगाव यांच्या कडुन 3,74,200/- रुपये किंमतीचे 106 ग्रॅम सोन्याचे दागीने व 429 ग्रॅम चांदीचे दागीने हस्तगत केले.
जळगाव जिल्ह्यातील अनेक गुन्हे दाखल
एमआयडीसी हद्दीतील चार ठिकाणी केलेल्या घरफोडीची कबुली दिली आहे. यात एमआयडीसीतील पो.स्टे.भाग -5 गुरनं 317/2019 भादवि 457, 380, 34, पो.स्टे.भाग -5 गुरनं 552/2019 भादवि 457, 380, पो.स्टे.भाग -5 गुरनं 548/2019 भादवि 457, 380 आणि पो.स्टे. भाग-5 गुरनं 530/2019 भादवि 457,3 80 हे गुन्हयांची कबुली दिलेली आहे. त्या व्यतीरीक्त आणखी बरेच गुन्हें उघडकीस
येण्याची शक्यता आहे. दोन्ही आरोपींना पुढील कारवाईसाठी एमआयडीसी पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
पोलीस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले व अपर पोलीस अधीक्षक भाग्यश्री नवटके, सहायक पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांनी एलसीबीचे बापू रोहम यांना दिलेल्या सुचनेनुसार सपोनि स्वप्नील नाईक, पोउनि सुधाकर लहारे, स.फौ.अशोक महाजन, पोहेकॉ.रविंद्र पाटील, अनिल जाधव, सुधाकर अंभोरे, विनोद पाटील, अनिल देशमुख, अशरफ शेख, दिपक पाटील, दादाभाऊ पाटील, महेश पाटील, विजयसिंग पाटील, पल्लवी मोरे, चालक अशोक पाटील तसेच तांत्रिक माहिती करीता पो.ह. विजय पाटील व नरेंद्र वारुळे नेमले होते.