Home Cities जळगाव मु. जे. महाविद्यालयात ‘फॅमिली अंताक्षरी स्पर्धा’चे आयोजन

मु. जे. महाविद्यालयात ‘फॅमिली अंताक्षरी स्पर्धा’चे आयोजन


 

जळगाव प्रतिनिधी । मु. जे. महाविद्यालयाच्या ‘इव्हेंट मॅनेजमेंट’ विभागातर्फे रविवार ८ सप्टेंबर रोजी महाविद्यालयाच्या परिसरात सायंकाळी ६ ते ९ या वेळेत फॅमिली अंताक्षरी स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.

जिल्ह्यात अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते जे कार्यक्रम युवक-युवतींसाठी असतात मात्र फॅमिली साठी अत्यंत कमी प्रमाणात कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. यानुषंगाने फॅमिली अंताक्षरी स्पर्धा चे आयोजन करण्यात येते या कार्यक्रमात ज्यांना भाग सहभाग घ्यायचा असेल त्यांनी चेतन बारी तसेच मोहित चव्हाण (५५११२६४११३) या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन इव्हेंट मॅनेजमेंट विभागाचे समन्वयक पंकज कासार यांनी केले आहे अधिक माहितीसाठी (८९८३०६८३०३) या क्रमांकावर संपर्क साधावा असेही त्यांनी पत्रकात नमूद केले आहे.


Protected Content

Play sound