जळगावात सीआरएमएस शाखेतर्फे रक्तदान शिबीर

ratdan shibir

जळगाव, प्रतिनिधी । येथील सेंटर रेल्वे मजदूर संघ शाखा जळगाव-पाचोरा यांच्यातर्फे रक्तदान शिबीर घेण्यात आले. सेंटर रेल्वे मजदूर संघ शाखेचे सचिव गणेश सिंग यांच्या वाढदिवसानिमित्ताने रक्तदान शिबिर घेण्यात आले.

विभागीय चेअरमन व्ही.के. समदडीया, विभागीय सचिव एस.बी. पाटील, विभागीय संयोजक एस.के. दुबे, शाखा सचिव गणेश सिंग, ब्रांच चेअरमन डी. के. रवी, रितेश श्रीवास्तव, विश्वास पाटील, कल्पना कुलकर्णी, अंजली पाटील, एस.पी. जोशी, वाल्मिक बोरसे, योगेश चव्हाण, निलेश पाटील, झाकीर अझीज, मो. शाकिब, सतिश सहदेव, पंकज अडकमोल, विनय सिन्हा, लक्ष्मी अय्यर, सोनाली बोस, मनिषा आमोदकर यांनी रक्तदान केले. शिबिरासाठी सतीश शर्मा, योगेश चव्हाण, प्रदीप पाटील, राहूल नारखेडे, ओकार ठाकूर यांनी परिश्रम घेतले.

Protected Content