भाजपचे बुथप्रमुख संमेलन उत्साहात

muktainagar

 

मुक्ताईनगर प्रतिनिधी । येथे मुक्ताईनगर विधानसभा क्षेत्रातील भारतीय जनता पक्षाच्या नुकत्याच झालेल्या ‘बुथप्रमुख संमेलन’ प्रसंगी खडसे यांनी मुक्ताईनगर विधानसभा क्षेत्रात केलेल्या विकास कामांच्या कार्यवृत्तांताचे वर्णन असलेल्या ‘समर्पण’ या पुस्तकाचे प्रकाशन मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले.

याबाबत अधिक माहिती अशी की, मुक्ताईनगर विधानसभाच्या ‘बुथप्रमुख संमेलन’ प्रसंगी विधानसभा अध्यक्ष ना. हरिभाऊ बागडे, माजी महसुल कृषी मंत्री आ.एकनाथराव खडसे, खा.रक्षाताई खडसे, बेटी बचाओ बेटी पढाओ अभियान संयोजक डॉ.राजेंद्रजी फडके, भाजपा प्रदेश उपाध्यक्ष अशोक कांडेलकर, भाजप जिल्हाध्यक्ष डॉ.संजीवजी पाटील, जळगाव जिल्हा मध्यवर्तीसह बँकेच्या अध्यक्षा रोहिणीताई खडसे खेवलकर संघटन सरचिटणीस प्रा.सुनिलजी नेवे, जिल्हा उपाध्यक्ष विलास धायडे, जिल्हा चिटणीस कैलास चौधरी, राजुभाऊ माळी, विधानसभा क्षेत्र प्रमुख रमेश ढोले, यांच्यासह क्षेत्र प्रमुख शिवाजीराव पाटील, बाजार समिती सभापती निवृत्ती पाटील, भाजप मुक्ताईनगर तालुकाध्यक्ष दशरथ कांडेलकर, भाजप बोदवड तालुकाध्यक्ष भागवत टिकारे, भाजप रावेर तालुकाध्यक्ष सुनिल पाटील, जेष्ठ कार्यकर्ते पुरणमल चौधरी, अनंत कुलकर्णी, विधानसभा क्षेत्रातील भाजपा पदाधिकारी, जि.प. सदस्य, नगराध्यक्ष, नगरसेवक, बुथ प्रमुख आणि कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

Protected Content