Home क्राईम विषारी औषध घेतलेल्या तरूणाचा उपचारादरम्यान मृत्यू

विषारी औषध घेतलेल्या तरूणाचा उपचारादरम्यान मृत्यू


Crime

जळगाव प्रतिनिधी । घरातील किरकोळ वादातून संतापाच्या भरात शनिवारी दुपारी विषारी औषध घेतलेल्या तरूणाचा जिल्हा रूग्णालयात उपचार सुरू असतांना आज सकाळी मृत्यू झाला. याबाबत जिल्हा पेठ पोलीसात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सुरेद्र धनराज खैरनार (वय-20) रा.साळवा नांदेड ता. धरणगाव या तरूणाने घरात झालेल्या वदातून संतापाच्या भरात उंदीर मारण्याचे औषध घेतले. त्याला अत्यवस्थ वाटू लागल्याने नातेवाईकांनी तातडीने चोपडा येथील ग्रामीण रूग्णालयात उचारार्थ दाखल केले. मात्र प्रकृती अधिक खालावल्याने त्याला जिल्हा वैद्यकिय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल केले. आज सकाळी 8.30 वाजता उपचारादरम्यान मृत्यू झाला. मयत सुरेंद्र हा धरणगाव महाविद्यालयात शिकत होता. वडील धनराज पुंजू खैरनार हे शेतमजूर असून आई, दोन भाऊ असा परीवार आहे. याप्रकरणी जिल्हा पेठ पोलीसात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.


Protected Content

Play sound