धरणगाव प्रतिनिधी । राजे प्रतिष्ठानची धरणगाव तालुका कार्यकारिणी जाहीर करण्यात आली असून नवनियुक्त पदाधिकार्यांना नियुक्तीपत्रे प्रदान करण्यात आली.
राजे प्रतिष्ठान संस्थापक अध्यक्ष छत्रपती उदयनराजे भोसले आणि कार्याध्यक्ष नितीन शिंदे महाराष्ट्र राज्य यांच्या संमतीने तालुका कार्यकारणी जाहीर करण्यात आली. समस्त पाटील समाज अध्यक्ष दिलिप बापू पाटील, भागवत (भैया भाऊ) मराठे व राजे प्रतिष्ठान धरणगाव तालुकाध्यक्ष वैभव पाटील यांच्या हातून नवनियुक्त पदाधिकार्यांना नियुक्ती पत्र देण्यात आले. नवनियुक्त कार्यकारिणीमध्ये राजु महाजन-शहर अध्यक्ष; दिनेश भदाणे-सचिव
त्र्यंबक पाटील तालुका संघटक,ललित मराठे तालुका कार्याध्यक्ष; योगेश पाटील(बांभोरी बु.)-तालुका उपाध्यक्ष;ललित पाटील-तालुका प्रसिध्दी प्रमुख यांचा समावेश असून त्यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.
याप्रसंगी राजे प्रतिष्ठान तालुकाध्यक्ष वैभव पाटील, विक्रम पाटील, अमोल महाजन, राकेश पाटील, निलेश महाजन, समीर तडवी, मेघराज पाटील, अतुल महाजन व विशाल ठाकुर आदी पदाधिकारी उपस्थित होते.