Home Cities एरंडोल विलास मोरे यांच्या ‘आधारवड’चे चित्रीकरण अंतिम टप्प्यात

विलास मोरे यांच्या ‘आधारवड’चे चित्रीकरण अंतिम टप्प्यात

0
26

aadhar

एरंडोल प्रतिनिधी । ‘आधारवड’ या चित्रपटाचे अंतिम टप्यातील चित्रिकरणासाठी ॲड. विलास मोरे सोलापूर येथे दि.२६ ऑगस्ट रोजी रवाना होत आहेत.

याबाबत माहिती अशी की, या चित्रपटाचे निर्माते राजकुमार हंचाटे व दिग्दर्शक सुरेश झाडे यांनी या चित्रपटाच्या मुख्य भुमिकेसाठी विलास मोरे यांची निवड केली आहे. चित्रपटात शक्ती कपुर, राखी सावंत, सयाजी शिंदे, जागो मोहन प्यारे व भागो मोहन प्यारे या मालिकेतील कलावंत अतुल परचुरे इत्यादी नामवंत कलाकरांसोबत विलास मोरेंची निवड झालेली आहे. साहित्य सेवेसोबतच रंगभुमी देखील मोरेंनी गाजवली आहे. तीन चोक तेरा, नवरा भाड्याने पाहिजे, नाथ हा माझा, एकच प्याला, नटसम्राट आदी नाटकांसह अनेक एकांकीकेत त्यांनी भुमीका साकारल्या आहेत. औदुबर साहित्य रसिक मंचचे अध्यक्ष ॲड. मोहन शुक्ला यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.


Protected Content

Play sound