Home Cities चाळीसगाव पिलखोड येथे शालेय विद्यार्थ्यांना वह्या वाटप

पिलखोड येथे शालेय विद्यार्थ्यांना वह्या वाटप

0
66

pilkhod

चाळीसगाव प्रतिनिधी । तालुक्यातील पिलखोड येथील राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष तथा भूमिपुत्र यज्ञेश बाविस्कर यांच्याकडून दि. 21 ऑगस्ट रोजी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त जि.प. प्राथमिक शाळेत वह्या वाटप करण्यात आल्या.

याबाबत माहिती अशी की, यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून श्रीकांत राजपूत आणि राहुल वाकलकर हे उपस्थित असून यांनी सांगितले की, गावाचे भूमिपुत्र यज्ञेश बाविस्कर हे नेहमीच सामाजिक कार्यात अग्रेसर असतात. वेगवेगळे उपक्रम राबवत असतात. पवार यांच्या वाढदिवसानिमित्त कुठलाही बडेजाव न करता त्यांनी वह्या देण्याचे आवाहन केले की, पिलखोडमधील जि.प. शाळेत वह्यांचे वाटप करण्यात आले. यानंतर यज्ञेश बाविस्कर बोलतांना म्हणाले की, “अश्या सामाजिक कार्यासाठी आमचे नेते माजी आमदार राजीव देशमुख यांच्याकडून सतत प्रेरणा मिळत असते. तर सायगाव-उंबरखेड गटाचे जि.प.सदस्य भूषण पाटील यांचे मार्गदर्शनाने मी असे सामाजिक उपक्रम राबवित असतो” याप्रसंगी प्रमोद पाटील, सौरभ पाटील आाणि आधी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेच्या मुख्याध्यापिका सुरेखा महाजन, शिक्षक भावसिंग पाटील, दत्तात्रेय माळी, जयप्रकाश चौधरी, विजय चव्हाण, लता पाटील, सुनीता जाधव, पूनम अहिरराव, रुपाली पाटील, प्रतिभा मराठे यांचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन उमेश पाटील यांनी केले.


Protected Content

Play sound