लता मंगेशकर, आमिर खान यांच्याकडून पूरग्रस्तांना मदत

aamir lata

 

मुंबई प्रतिनिधी । सांगली आणि कोल्हापूरातील पुरग्रस्तांच्या मदतीसाठी लता मंगेशकर यांनी 11 लाखांची तर आमिरने 25 लाखांची मदत केली असून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटरद्वारे त्यां दोघांचे आभार मानले आहेत.

याबाबत माहिती अशी की, स्थानिक सरपंचांपासून ते मंत्र्यांपर्यंत, शाळकरी मुलांपासून ते सरकारी नोकरदारांपर्यंत, व्यापाऱ्यांपासून ते उद्योजकांपर्यंत, पंढरपूरपासून ते शिर्डी देवस्थानपर्यंत सर्वांनीच पूरग्रस्तां मदतीचा हात पुढे केला आहे. सोशल मीडियावरही मित्रपरिवार एकत्र येऊन पूरग्रस्तांच्या मदतीचे आवाहन करत आहे. याकामी मराठी सिनेकलाकारही मागे नाहीत. अनेकांनी पुरग्रस्तांपर्यंत आपली मदत पोहोचवली असून बॉलिवूडमधील मंडळी देखील पुरग्रस्तांना मदत करण्यासाठी सरसावले आहेत. लता मंगेशकर आणि आमिर खान यांनी मुख्यमंत्री साहाय्यता निधीत रक्कम जमा केली आहे. लता मंगेशकर यांनी 11 लाखांची तर आमिरने 25 लाखांची मदत केली असून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटरद्वारे त्यां दोघांचे आभार मानले आहेत.

Protected Content