Home राष्ट्रीय राज्यातील पाच जणांना जीवन रक्षा पदक पुरस्कार घोषीत

राज्यातील पाच जणांना जीवन रक्षा पदक पुरस्कार घोषीत

0
78

नवी दिल्ली वृत्तसंस्था । केंद्रीय गृहमंत्रालयाच्या वतीने देशातील ४८ व्यक्तींना आज जीवन रक्षा पदक पुरस्कार घोषीत करण्यात आले असून यात महाराष्ट्रातील पाच जणांचा समावेश आहे.

देशातील ४८ नागरिकांना तीन श्रेणीत हे पुरस्कार जाहीर झाले आहेत. यातील ८ व्यक्तींना मरणोत्तर मसर्वोत्तम जीवन रक्षा पदकफ जाहीर झाले आहेत. उत्तम जीवन रक्षा पदक पुरस्कार १५ जणांना आणि जीवन रक्षा पदक पुरस्कार २५ जणांना जाहीर झाले आहेत. पुरस्काराचे स्वरूप पदक, केंद्रीय गृहमंत्री यांच्या हस्ताक्षरातील प्रमाणपत्र आणि डिमांड ड्राफ्ट स्वरूपात पुरस्कार रक्कम असे आहे.

यात महाराष्ट्रातील कौस्तुभ तारमाळे आणि प्रथमेश वाडकर यांना मरणोत्तर सर्वोत्तम जीवन रक्षा पदक जाहीर झाले आहे. डॉ. चरणजितसिंह सलुजा आणि अमोल लोहार यांना उत्तम जीवन रक्षा पदक जाहीर झाले आहे. तर जीवन रक्षा पदक पुरस्कार धैर्यशील आडके यास जाहीर झाला आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound