Home क्रीडा प्रजाकसत्ताक दिनानिमित्त बुध्दिबळ स्पर्धेचे आयोजन

प्रजाकसत्ताक दिनानिमित्त बुध्दिबळ स्पर्धेचे आयोजन

0
36

जळगाव– जळगाव येथे दिनांक २६ व २७ जानेवारीला प्रजासत्ताक दिनानिमित्त खुल्या बुध्दिबळ स्पर्धेचे आयोजन जळगाव जिल्हा बुध्दिबळ संघटना व जैन स्पोर्ट्स अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने नवीन बस स्टँड जवळील कांताई सभागृहात सकाळी दहा वाजता कऱण्यात आले आहे.

स्पर्धेत खुल्या गटात प्रथम दहा खेळाडूंना आकर्षक पारितोषिक देण्यात येतील. .तसेच प्रत्येक वयोगटातील खेळाडूंसाठी वयोगट ७,१०,१३ पहिल्या पाच खेळाडूंना सुध्दा बक्षीस देऊन गौरविण्यात येईल. स्पर्धेसाठी प्रवेश मोफत असून नाव नोंदणी दिनांक २५ जानेवारी संध्याकाळी ७ वाजेपर्यंत नोंदविता येतील.*
स्पर्धकांनी नाव नोंदणी कांताई सभागृह येथे प्रवीण ठाकरे व परेश देशपांडे यांचेकडे करावी. स्पर्धेत जास्तीत जास्त खेळाडूंनी सहभागी व्हावे असे आवाहन जिल्हा बुध्दिबळ संघटनेचे अध्यक्ष अतुल जैन, उपाध्यक्ष फारूक शेख व जैन स्पोर्ट्स अकॅडमी यांच्यावतीने करण्यात आलेले आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound