जमीन घोटाळा प्रकरणी सीबीआयचे छापे

रोहतक वृत्तसंस्था । गुरूग्राम येथील जमीन घोटाळ्या प्रकरणी हरियाणाचे माजी मुख्यमंत्री भुपेंद्रसिंह हुड्डा यांच्या निवासासह अन्य ठिकाणांवर आज सीबीआयने छापे मारले.

सीबीआयने एकूण ३० ठिकाणी छापे मारले. हुड्डा यांची शुक्रवारी जिंद सेक्टर-९ मध्ये रॅली होणार होती. सकाळी ५ वाजताच सीबीआयने रोहतकच्या निवासस्थानी छापा मारला. हुड्डा यांच्या घराच्या तिजोर्‍यांचे कुलूप खोलण्यासाठी दोन एक्सपर्ट बोलवावे लागले. ते सुमारे एक तास आत होते. त्यांनी ६-७ तिजोर्‍यांचे कुलूप उघडल्याचे सांगितले. असोसिएटेड जर्नल्स लिमिटेड (एजेएल) ला चुकीच्या पद्धतीने जमीन वाटप केल्या प्रकरणी हे छापेमारी झाल्याचे मानले जात आहे. दरम्यान, या प्रकरणी भाजप दबावाचे राजकारण करत असल्याचा काँग्रेसतर्फे आरोप करण्यात आला आहे.

Add Comment

Protected Content