मुक्ताईनगर प्रतिनिधी । तालुक्यातील जोंधनखेडा येथील गोरक्षगंगा नदीवरील कुंड धरणाचे जलपूजन आ. एकनाथराव खडसे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी खासदार रक्षाताई खडसे, जिल्हा बँक अध्यक्षा रोहिणीताई खडसे-खेवलकर, माजी माहिती आयुक्त व्हि. डी. पाटील, जि. प. उपाध्यक्ष नंदू महाजन, माजी जि. प. अध्यक्ष अशोक कांडेलकर, बाजार समिती सभापती निवृत्ती पाटील, पं. स. सभापती प्रल्हाद जंगले, विधानसभा क्षेत्रप्रमुख रामेश ढोले,सहक्षेत्र प्रमुख शिवाजीराव पाटील, तालुकाध्यक्ष दशरथ कांडेलकर, विस्तारक विलास धायडे, सरचिटणीस डॉ बी. सी. महाजन, संदीप देशमुख, जि. प. सदस्या वनिता गवळे, कैलास सरोदे, पांडुरंग नाफडे आदी उपस्थित होते.
यावेळी आ एकनाथराव खडसे म्हणाले की, युती शासनाच्या काळात जलसंपदामंत्री असताना मंत्री पदाच्या कारकिर्दीत जोंधनखेडा ता मुक्ताईनगर येथे गोरक्षगंगा नदीवर बांधलेले कुंड धरण यावर्षी पुरेशा पावसाने पुर्ण क्षमतेने भरले आहे. त्यामुळे जलपूजन करण्याचा योग आला भरलेले धरण बघून मनस्वी आनंद होत आहे. या धरणामुळे कुर्हा काकोडा परिसरातील सुमारे १५०० एकर जमिन ओलिताखाली येण्यास मदत होणार आहे. भविष्यात या धरणाची उंची ३ मीटर ने वाढवून कुर्हा वढोदा उपसा सिंचन योजनेद्वारे पूर्णा तापी नदीत वाहून जाणारे पाणी कुंड धरणात टाकून बंदिस्त पाईप लाईन द्वारे परिसरात १४०० शेततळे निर्माण करून शेतकर्यांना शेतीसाठी देण्यात येईल.