Home Cities यावल न्हावीच्या सरपंचांनी जवानांना बांधल्या राख्या

न्हावीच्या सरपंचांनी जवानांना बांधल्या राख्या

0
22

rakshabandhan nhavi taluka yawal
rakshabandhan nhavi taluka yawal

फैजपूर, ता. यावल प्रतिनिधी । येथून जवळच असलेल्या न्हावी येथील सरपंच भारती चौधरी यांनी जवानांना राख्या बांधून रक्षाबंधन साजरे केले.

येथून जवळ असलेल्या न्हावी गावातील भारतीय सैन्यात कार्यरत असलेले जवान निलेश दिनकर पाटील आणि नुकतेच सेवानिवृत्त झालेले गणेश श्रावण वसाने यांना सरपंच भारती चौधरी यांनी राख्या बांधल्या. तसेच भारत मातेचे प्रतिमेचे पूजन करण्यात आले. याप्रसंगी सरपंच भारती चौधरी म्हणाल्या की, ज्याप्रमाणे बहिण भावाला राखी बांधून भाऊ तिचे रक्षण करतो त्या प्रकारे आपले सैनिक देशाच्या सीमेवर खडा पहारा देऊन आपल्या देशाचे रक्षण करत असतात. आणि म्हणूनच आपण शांततेत जीवन जगत आहोत यावेळी ग्रामपंचायत उपसरपंच सतीश जंगले, ग्रामनपंचयात सदस्य तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी मनोगत सुनील श्रीखंडे व आभार किशोर लोखंडे यांनी मानले.


Protected Content

Play sound