Home Cities जामनेर जामनेरातील ज्ञानगंगा व एकलव्य विद्यालयात स्वातंत्र्यदिनी ‘तंबाखूमुक्त’ची शपथ

जामनेरातील ज्ञानगंगा व एकलव्य विद्यालयात स्वातंत्र्यदिनी ‘तंबाखूमुक्त’ची शपथ


jamner 1 1

जामनेर प्रतिनिधी । ज्ञानगंगा बहुउद्देशीय शिक्षण प्रसारक मंडळ संचलित, ज्ञानगंगा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय व एकलव्य प्राथमिक विद्यालय शिवाजी नगर जामनेर येथे स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा करण्यात आला. संस्थेचे संचालक मंडळातील संचालक के.बी.माळी यांच्याहस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

यावेळी दीपक पाटील प्रमुख पाहुणे हे उपस्थित होते. पुखराज डांगी व विद्यालयाचे प्राचार्य आर.जे.सोनवणे व सिनिअर कॉलेजचे शिंदे तसेच आयएमआर कॉलेजचे प्राचार्य किशोर पाटील व बहुसंख्य पालक उपस्थित होते. ध्वजारोहणानंतर सर्व मान्यवर व विद्यार्थी व शिक्षक यांनी तंबाखूमुक्त शपथ घेतली. विद्यार्थ्यांना बिस्किट वाटप करण्यात आले. सूत्रसंचलन निलेश पाटील यांनी केले. तर संचलन विद्यालयाचे क्रीडाशिक्षक व्ही.एन. पाटील यांनी केले. यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी बंधू व भगिनी यांनी परिश्रम घेतले.


Protected Content

Play sound