भुसावळ शहरात ठिकठिकाणी ध्वजारोहण उत्साहात

bhusawal 2

भुसावळ प्रतिनिधी । भुसावळ शहरातील ठिकठिकाणी ७३ वा १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यात भुसावळ रेल्वे मंडळ, रेल्वे गुड्स शेड आणि गांधी चौकात मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. विविध कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात आले होते.

 

भुसावल रेल्वे विभाग
सकाळी ८ वाजेच्या सुमारास मंडल रेल्वे प्रबंधक विवेककुमार गुप्ता यांच्या शुभहस्ते मंडळ रेल प्रबंधक कार्यालयाच्या प्रांगणात झेंडावंदन करण्यात आले. यावेळी आरपीएफ कर्मचाऱ्यांना झेंडाला वंदन करुन सलामी अणि मंडळ रेल्वे प्रबंधक विवेककुमार गुप्ता यांनी परेडचे निरिक्षण केले. महाप्रबधंक यांचा संदेश वाचून दाखविला अणि त्यानंतर आरपीएफ कर्मचाऱ्यांनी परेडला सुरवात करण्यात आली. रेल्वे प्रबंधक विवेक गुप्ता यांनी रेल्वे कर्मचाऱ्यांना ७३ वा स्वातंत्र दिनाचा संदेश दिला.सर्व कर्मचार्याना स्वातंत्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या. त्यानंतर रेल्वे शाळेत विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम अणि देश भक्तिवर गीत लोकनाट्य सादर करण्यात आले.

bhusawal 1

याप्रसंगी अपर मंडल रेल प्रबंधक मनोज सिन्हा, आरपीएफ आयुक्त अजय दुबे, वरिष्ट मंडल कार्मिक अधिकारी एन. डी. गांगुर्डे, वरिष्ट मंडल परिचालन प्रबंधक स्वप्निल नीला, वरिष्ट मंडल वाणिज्य प्रबंधक आर. के. शर्मा, वरिष्ट मंडल विद्युत अभियंता जी. के. लखेरा, वरिष्ट मंडल दुरसंचार, सिंगनल अभियंता निशांत द्रिवेदी, वरिष्ट मंडल अभियंता राजेश चिखले, वरिष्ट मंडल संरक्षा अधिकारी एन. के. अग्रवाल, वरिष्ट मंडल विद्युत अभियंता पी. के. भंज, वरिष्ट मंडल विद्युत अभियंता प्रदीप ओक सर्व अधिकारी उपस्थित होते. कर्मचारी वर्ग, स्काउट गाइड विद्यार्थी यांच्यासह शाळेतील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

नवीन रेल्वे गुड शेड, भुसावळ
नवीन रेल्वे गुड शेड येथील वाणिज्य विभागात वरिष्ट मंडल वाणिज्य प्रबंधक आर.के. शर्मा यांच्या शुभहस्ते झेंडा वंदन करण्यात आले. आर.के. शर्मा यानी सर्व कर्मचाऱ्यांना स्वातंत्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या. आणि महाप्रबधंक यांचा संदेश वाचून दाखविला. त्यानंतर गुड्स शेड परिसरात वरिष्ट मंडल वाणिज्य प्रबंधक आर.के. शर्मा यांच्या शुभहस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी मंडल वाणिज्य प्रबंधक बी. अरुणकुमार, सहायक वाणिज्य प्रबंधक अजय कुमार, वाणिज्य निरीक्षक जीवन चौधरी, सुदर्शन देशपांडे, आर.डी. क्षीरसागर, संजय चापोरकर, शैलेश पारे, प्रवीन जंजाले, मुख्य माल पर्यवेक्षक जंगम, प्रवीन शर्मा यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते.

Protected Content