Home Cities जामनेर जिल्हा बँक निवडणुकीत विरोधकांचे डिपॉझिट जप्त होणार ; महायुती बहुमताने सत्ता मिळवणार...

जिल्हा बँक निवडणुकीत विरोधकांचे डिपॉझिट जप्त होणार ; महायुती बहुमताने सत्ता मिळवणार – मंत्री गिरीश महाजन

0
2


जामनेर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी जामनेर येथे मतदानाचा हक्क बजावला. यावेळी नगराध्यक्ष साधना महाजन यांनीही मतदान केले. मतदानानंतर माध्यमांशी संवाद साधताना मंत्री गिरीश महाजन यांनी जिल्हा बँकेच्या निवडणुकीत महायुतीला बहुमत मिळणार असल्याचा विश्वास व्यक्त केला. तसेच निवडणूक रिंगणातील विरोधकांचे डिपॉझिट जप्त होईल, असा दावा त्यांनी केला.

जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी आज मतदान प्रक्रिया सुरू असून, जामनेर येथे मंत्री गिरीश महाजन आणि नगराध्यक्ष साधना महाजन यांनी मतदान केंद्रावर जाऊन आपला मतदानाचा हक्क बजावला. मतदानानंतर पत्रकारांशी बोलताना मंत्री महाजन यांनी निवडणुकीच्या निकालाबाबत महायुतीच्या विजयाचा विश्वास व्यक्त केला.

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत महायुतीचे १२ उमेदवार यापूर्वीच बिनविरोध विजयी झाले असल्याचे मंत्री महाजन यांनी सांगितले. त्यामुळे बँकेत महायुतीची बहुमताने सत्ता स्थापन होणार असल्याचा दावा त्यांनी केला. उर्वरित नऊ जागांसाठी निवडणूक रिंगणात असलेले महायुतीचे उमेदवारही मोठ्या मताधिक्याने विजयी होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. विरोधकांच्या कामगिरीवर भाष्य करताना मंत्री गिरीश महाजन यांनी विरोधकांचे डिपॉझिट जप्त होईल, अशी आक्रमक प्रतिक्रिया माध्यमांना दिली. जिल्हा बँकेच्या निवडणुकीत महायुतीच्या बाजूने मतदारांचा कौल मिळणार असून, बिनविरोध निवड झालेल्या उमेदवारांसह उर्वरित जागांवरही विजय मिळवून बहुमत कायम राहील, असे त्यांनी सांगितले.


Protected Content

Play sound