Home Cities जळगाव डॉ. एजाज मलिक यांचा राष्ट्रीय स्तरावर गौरव! मानद डॉक्टरेटसह ‘व्हिजनरी एक्सलन्स अवॉर्ड...

डॉ. एजाज मलिक यांचा राष्ट्रीय स्तरावर गौरव! मानद डॉक्टरेटसह ‘व्हिजनरी एक्सलन्स अवॉर्ड २०२६’ने सन्मानित

0
3


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । शिक्षण, सामाजिक कार्य आणि समुदाय विकास क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणारे जळगावचे डॉ. एजाज अब्दुल गफ्फार मलिक यांना राष्ट्रीय स्तरावर मोठा सन्मान प्राप्त झाला आहे. त्यांच्या शैक्षणिक आणि सामाजिक कार्याची दखल घेत युनिव्हर्सल ऑनररी अवॉर्ड कौन्सिल (UHAC), दिल्ली यांच्या वतीने त्यांना प्रतिष्ठेची मानद डॉक्टरेट (Honorary Doctorate) पदवी प्रदान करण्यात आली. यासोबतच दूरदृष्टीपूर्ण नेतृत्व आणि समाजविकासातील योगदानाबद्दल त्यांना ‘व्हिजनरी एक्सलन्स अवॉर्ड २०२६’ (Visionary Excellence Award 2026) देऊन गौरविण्यात आले. गुरुवार, २६ नोव्हेंबर २०२६ रोजी आयोजित विशेष सोहळ्यात हा सन्मान प्रदान करण्यात आला.

डॉ. एजाज मलिक यांनी शिक्षणाच्या माध्यमातून समाजातील विविध घटकांना प्रगतीची संधी उपलब्ध करून देणे, सामाजिक बांधिलकी जपणे आणि समुदाय विकासासाठी सातत्याने प्रयत्न करणे या क्षेत्रांत महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेत युनिव्हर्सल ऑनररी अवॉर्ड कौन्सिलने त्यांची मानद डॉक्टरेट आणि व्हिजनरी एक्सलन्स अवॉर्ड या दोन्ही प्रतिष्ठित सन्मानांसाठी निवड केली. त्यांच्या कार्याचा राष्ट्रीय स्तरावर झालेला हा गौरव जळगावच्या शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रासाठीही अभिमानास्पद मानला जात आहे.

या गौरव सोहळ्याला शिक्षण क्षेत्रातील अनेक नामवंत प्राचार्य, प्राध्यापक, डॉक्टर आणि विविध विषयांचे तज्ज्ञ उपस्थित होते. यामध्ये प्रा. डॉ. एल. पी. देशमुख, प्रा. डॉ. साजिद अब्दुल हफीज अन्सारी, प्रा. डॉ. आर. पी. फाळक, प्रा. एस. एच. जैदी, डॉ. जाकीर अली अब्बास अली सय्यद, प्रा. पी. के. लभाने, प्रा. सय्यद हुसेन सज्जनसाब, प्रा. कमरुन्निसा बेगम इक्रमुद्दीन, प्रा. किशोर गोविंद कोल्हे, डॉ. आनंद उपाध्याय आणि प्रा. माधवसिंग इंगळे यांची उपस्थिती होती.

तसेच प्रा. डॉ. शेखर एन. शिरसाठ, प्रा. डॉ. साजिद अली कादरी, डॉ. एस. एम. शकील, प्रा. डॉ. रवींद्र एच. पाटील, प्रा. डॉ. नितीन फिरके, प्रा. डॉ. ज्ञानसागर डी. भोकरे, प्रा. जयेश पडवी, प्रा. डॉ. सतीश कराड, प्रा. डॉ. राजू बी. वनारसे आणि प्रा. डॉ. कुणाल डी. गायकवाड यांनीही या सोहळ्याला उपस्थिती लावून डॉ. मलिक यांच्या यशाचे कौतुक केले.

याप्रसंगी संस्थेचे व्यवस्थापन सदस्य बशीर बाबा बागवान आणि मोहम्मद शफी शेख कादर उपस्थित होते. एम. ए. आर. अँग्लो उर्दू हायस्कूलचे मुख्याध्यापक नईम बशीर सर, उपमुख्याध्यापक फारूक सिकंदर सर, पर्यवेक्षक नाझिम खान सर, एचएनएमसी ज्युनिअर कॉलेजचे डॉ. रईस गनी सर, मोईन काझी सर यांच्यासह सर्व शिक्षकवृंदानेही या गौरव सोहळ्यात सहभाग घेतला.

डॉ. एजाज अब्दुल गफ्फार मलिक यांना मानद डॉक्टरेट आणि ‘व्हिजनरी एक्सलन्स अवॉर्ड २०२६’ असे दुहेरी सन्मान मिळाल्याने त्यांच्या कार्याचा राष्ट्रीय स्तरावर गौरव झाला आहे. त्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल जळगावमधील शैक्षणिक, सामाजिक आणि विविध क्षेत्रांतून अभिनंदनाचा वर्षाव होत असून, त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या जात आहेत.


Protected Content

Play sound