जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । आज सकाळी जळगाव शहरासह जिल्ह्यात ठिकठिकाणी भूकंपाचा सौम्य धक्का जाणवल्याने खळबळ उडाली आहे. तर याबाबत अद्याप प्रशासनाच्या वतीने अधिकृत माहिती जारी करण्यात आलेली नाही.
आज सकाळी ९.१६ ते ९.१८ वाजेच्या सुमारास भूकंपाचा सौम्य धक्का जाणवला. अगदी सौम्य क्षमतेचा हादरा अनेकांनी अनुभवला. जळगाव, भुसावळ, यावल, रावेर, बोदवड आदी तालुक्यांमध्ये भूकंपाचा हा धक्का जाणवल्याची माहिती लाईव्ह ट्रेंडस न्यूजच्या प्रतिनिधींनी दिली आहे. यात अचानक घरातील वस्तू हलू लागल्याने तसेच पलंग, बेड हादरल्याचा अनुभव नागरिकांनी घेतला. त्यामुळे काही काळ नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.

या संदर्भात प्रस्तुत प्रतिनिधीने आपत्ती व्यवस्थापन अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता तो होऊ शकला नाही. दरम्यान, राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राच्या संकेतस्थळावर देखील याची अधिकृत नोंद करण्यात आलेली नसल्याचे दिसून आले. आम्ही या संदर्भात प्रशासनाच्या वतीने अधिकृत माहिती घेऊन लवकरच हे वृत्त अपडेट करतो. ताज्या वृत्तानुसार हा भूकंप ४.५ मॅग्निट्युड इतक्या क्षमतेचा असून याचे केंद्र मध्य प्रदेशातील खरगोन हे असल्याचे कळते



