Home धर्म-समाज खामगावच्या जगदंबा माता शांती उत्सवाची मुक्ताईनगरमध्येही भक्तिमय वातावरणात सांगता!

खामगावच्या जगदंबा माता शांती उत्सवाची मुक्ताईनगरमध्येही भक्तिमय वातावरणात सांगता!

0
12

मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । संपूर्ण भारतात प्रसिद्ध असलेल्या खामगाव येथील जगदंबा माता नवरात्र शांती उत्सवाची धार्मिक परंपरा आता मुक्ताईनगरमध्येही रुजत आहे. शहरातील संताजी नगर परिसरात सलग दुसऱ्या वर्षी या उत्सवाचे भक्तिभावाने आणि मोठ्या उत्साहात आयोजन करण्यात आले. अनेक दिवस चाललेल्या या उत्सवाची सांगता जगदंबा मातेच्या पारंपरिक विसर्जन सोहळ्याने करण्यात आली.

खामगाव येथे कोजागिरी पौर्णिमेपासून अष्टमीपर्यंत जगदंबा माता शांती उत्सव साजरा करण्याची जुनी धार्मिक परंपरा आहे. याच परंपरेचे अनुकरण करत मुक्ताईनगरमधील संताजी नगर येथेही मागील वर्षापासून या उत्सवाला सुरुवात झाली आहे. यंदाही कोजागिरी पौर्णिमेपासून उत्सवाला प्रारंभ करण्यात आला होता. या काळात परिसरात धार्मिक आणि भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. भाविकांनी उत्सवात उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.

उत्सवाच्या सांगतेनिमित्त जगदंबा मातेचा विसर्जन सोहळा पार पडला. यावेळी अत्यंत भावपूर्ण वातावरणात आणि पारंपरिक धार्मिक विधींनुसार मातेचे विसर्जन करण्यात आले. जगदंबा मातेच्या जयघोषाने संपूर्ण संताजी नगर परिसर दुमदुमून गेला. भाविकांनी श्रद्धेने मातेचे दर्शन घेत निरोप दिला.


Protected Content

Play sound