जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । टायगर ग्रुप इंडिया अध्यक्ष तानाजी जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त टायगर ग्रुप जळगाव जिल्ह्याच्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या सामाजिक उपक्रमाला रक्तदात्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. शिबिरात एकूण ३५ रक्तदात्यांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली.
तानाजी भाऊ जाधव यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून रक्तदान शिबिरासह अन्नदान कार्यक्रमाचेही आयोजन करण्यात आले होते. रक्तदान हे श्रेष्ठदान असून गरजू रुग्णांना वेळेवर रक्त उपलब्ध व्हावे, या सामाजिक भावनेतून हा उपक्रम राबविण्यात आला. रक्तदानातून अनेकांचे प्राण वाचविण्यास मदत होते, हा संदेशही या माध्यमातून देण्यात आला.

या कार्यक्रमाला टायगर ग्रुप जळगाव शहराध्यक्ष गौरव उमप, बॉबी चांगरे, समाजसेवक सोपान मानकर, ग्रामपंचायत उपसरपंच आनंद घुगे, रवींद्र पाटील, गणेश गोपाल, बंटी बारी, पवन रायचंदे, सचिन रायचंदे, शुभम उमप, योगेश पाटील, रवींद्र ठाकूर, बाबू लोडे, प्रथम लोंढे, युवराज नाथ, दादू जोशी, मयूर चव्हाण, गौरव नाथ, दुरवली निंबाळकर, दीपक मराठे, भूरा गायकवाड, आकाश सोनवणे, प्रदीप पाटील, वाल्मीक पाटील यांच्यासह टायगर ग्रुपचे जळगाव जिल्ह्यातील सदस्य उपस्थित होते.



