Home Cities जळगाव नोव्हेंबरच्या लोकशाही दिनाला नागरिकांचा प्रतिसाद ; विविध विभागांकडे ३२ तक्रार अर्ज दाखल

नोव्हेंबरच्या लोकशाही दिनाला नागरिकांचा प्रतिसाद ; विविध विभागांकडे ३२ तक्रार अर्ज दाखल

0
16

जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जिल्हाधिकारी कार्यालयात नोव्हेंबर महिन्याचा लोकशाही दिन व अल्पबचत दिन पार पडला. यावेळी विविध शासकीय विभागांशी संबंधित समस्या आणि तक्रारी मांडण्यासाठी नागरिकांनी उपस्थिती लावली. या लोकशाही दिनात एकूण ३२ अर्ज प्राप्त झाले असून, वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नागरिकांच्या तक्रारी स्वीकारल्या.

यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी वैशाली चव्हाण, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावित, जिल्हा पुरवठा अधिकारी महेश चौधरी, जिल्हा कृषी अधीक्षक कुर्बान तडवी आणि जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी भाऊसाहेब अकलाडे उपस्थित होते.

नागरिकांनी विविध शासकीय विभागांशी संबंधित प्रश्न, अडचणी आणि तक्रारी अधिकाऱ्यांसमोर मांडल्या. संबंधित अधिकाऱ्यांनी नागरिकांचे अर्ज स्वीकारून तक्रारींची दखल घेतली. लोकशाही दिनाच्या माध्यमातून नागरिकांना आपल्या समस्या थेट प्रशासनापर्यंत पोहोचविण्याची संधी मिळाली.एकूण ३२ अर्ज प्राप्त झाल्याने नागरिकांनी या उपक्रमाला प्रतिसाद दिल्याचे दिसून आले. प्राप्त तक्रारींवर संबंधित विभागांकडून काय कार्यवाही होते, याकडे आता अर्जदारांचे लक्ष लागले आहे.


Protected Content

Play sound