कार्यशाळेत राज्य फेडरेशनचे उपाध्यक्ष डॉ. शांतीलाल सिंगी (छत्रपती संभाजीनगर), सहकार प्रशिक्षण केंद्राचे संचालक अमित ओझे (पनवेल), डॉ. सुरेश पांडे, प्रा. सी. ए. तसेच ज्येष्ठ विचारवंत प्रकाश पाठक यांनी मार्गदर्शन केले. पतसंस्थांची गुणात्मक वाढ, नफाक्षमता, कर्मचाऱ्यांचे गुणवत्तापूर्ण कामकाज, संस्थेच्या निर्णयप्रक्रियेत संचालकांचा सहभाग, सुरक्षित गुंतवणूक, सामाजिक बांधिलकी, सभासदांना दर्जेदार सेवा पुरविणे, देशाच्या अर्थव्यवस्थेतील पतसंस्थांचे योगदान आणि स्पर्धेच्या युगात टिकून राहण्यासाठी आवश्यक प्रशिक्षण आदी विषयांवर वक्त्यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. यावेळी उपस्थितांशी चर्चात्मक संवादही साधण्यात आला.

कार्यशाळेचे उद्घाटन जळगाव जनता बँकेचे अध्यक्ष सतीश मदाने, बँक असोसिएशनचे अध्यक्ष चंद्रहास गुजराथी, प्रशिक्षण संस्था अध्यक्ष संजय बिर्ला, राष्ट्रीय संघटन प्रमुख दिलीप रामू पाटील, उपाध्यक्ष शरद जाधव आणि जिल्हाध्यक्ष नरेंद्र नारखेडे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले.
महामंत्री शशिकांत बेहडे व शहर महामंत्री प्रमोद नवलकर आणि जयदीप शहा यांनी पाहुण्यांचा परिचय करून देत त्यांचा सत्कार केला. सूत्रसंचालन उपाध्यक्ष शरद जाधव यांनी केले. कार्यक्रमास सहकार भारतीच्या शहराध्यक्ष शोभा पाटील, उपाध्यक्ष सुधीर आबा पाटील (चाळीसगाव), मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष सुनील भंगाळे, गंगाराम गवळी, पतसंस्था प्रकोष्ठ प्रमुख प्रशांत केले, सविता नाईक यांच्यासह सहकार भारतीचे पदाधिकारी, पतसंस्थांचे अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि व्यवस्थापक उपस्थित होते.
कार्यशाळा अध्यक्ष संजय बिर्ला, उपाध्यक्ष शरद जाधव, राष्ट्रीय संघटन प्रमुख दिलीप पाटील आणि जिल्हाध्यक्ष नरेंद्र नारखेडे यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरीत्या पार पडली.



