सावदा, ता. रावेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । सावदा, ता. रावेर । सातपुडा विकास मंडळ संचालित कृषी विज्ञान केंद्र, पाल यांच्या वतीने शुक्रवार, दि. ३० ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता पीएम किसान सन्मान निधीचा २४ वा हप्ता वितरण सोहळा अर्थात ‘पीएम किसान उत्सव दिवस’ तसेच रब्बी हंगाम शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमाला भारत सरकारच्या युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालयाच्या केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहणार आहेत. तसेच रावेर-यावल विधानसभा मतदारसंघाचे आमदार अमोल जावळे आणि विधान परिषद सदस्य नंदकिशोर महाजन यांची विशेष उपस्थिती राहणार आहे.

शेतकरी मेळाव्यात रब्बी हंगामातील पिकांवरील कीड व रोग नियंत्रण, कमी पाण्यात पीक नियोजन तंत्र, पशुधन संगोपन व चारा व्यवस्थापनाचे प्रात्यक्षिक तसेच दुष्काळी परिस्थितीत फळबाग व्यवस्थापन आदी महत्त्वपूर्ण विषयांवर कृषी तज्ज्ञांकडून मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
रब्बी हंगामाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना आधुनिक कृषी तंत्रज्ञानाची माहिती मिळावी, उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करून उत्पादन वाढविण्याच्या पद्धती समजाव्यात तसेच पशुधन आणि फळबाग व्यवस्थापनाबाबत उपयुक्त मार्गदर्शन मिळावे, हा या मेळाव्याचा प्रमुख उद्देश आहे.
हा कार्यक्रम कृषी विज्ञान केंद्र, पाल, ता. रावेर, जि. जळगाव येथे शुक्रवार, दि. ३० ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता होणार आहे. परिसरातील शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कृषीविषयक तांत्रिक मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.



