धरणगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । साकरे, ता. धरणगाव येथे वीज पडून २० बकऱ्या मृत्युमुखी पडल्याने आर्थिक संकटात सापडलेल्या गरीब कुटुंबांना भारतीय जनता पक्षाच्या वतीने आर्थिक मदत करण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त राबविण्यात येत असलेल्या ‘सेवा संकल्प पंधरवडा’ अभियानांतर्गत ही मदत देण्यात आली.
साकरे येथील नारायण पारधी, भाऊसाहेब पारधी, आंबा पाटील आणि गोकुळ पाटील यांच्या बकऱ्यांचा वीज पडल्याने मृत्यू झाला होता. बकऱ्यांच्या मृत्यूमुळे संबंधित कुटुंबांचे मोठे आर्थिक नुकसान झाले. या पार्श्वभूमीवर संकटग्रस्त कुटुंबांना दिलासा देण्यासाठी भाजपच्या वतीने आर्थिक मदत करण्यात आली.

नैसर्गिक आपत्तीमुळे पशुधनाचे नुकसान झाल्याने संबंधित कुटुंबांसमोर उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला होता. अशा परिस्थितीत भाजपच्या कार्यकर्त्यांनी कुटुंबांची भेट घेऊन त्यांच्या अडचणी जाणून घेत आर्थिक मदतीचा हात दिला.
यावेळी भाजप तालुकाध्यक्ष दिनेश पाटील, दिलीप महाजन, चंदन पाटील, नगरसेवक गुलाब मराठे, भैया मराठे, चेतन जाधव, गोपाल पाटील, गणेश मराठे, साकरे येथील गोकुळ पाटील, विशाल पाटील, शरद पाटील, किशोर पाटील, प्रवीण बाविस्कर, सुनील पाटील, मंगा पाटील, जामलाल पारधी, राजू पाटील, सतीश पाटील यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
वीज पडून पशुधन गमावलेल्या कुटुंबांना या मदतीमुळे काही प्रमाणात आर्थिक आधार मिळाला. नैसर्गिक आपत्तीच्या काळात गरजू कुटुंबांच्या मदतीसाठी पुढाकार घेण्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.



