Home Cities अमळनेर अमळनेरमध्ये शासकीय रेखाकला परीक्षेला उत्स्फूर्त प्रतिसाद

अमळनेरमध्ये शासकीय रेखाकला परीक्षेला उत्स्फूर्त प्रतिसाद

0
27

अमळनेर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । खान्देश शिक्षण मंडळ संचलित प्रताप हायस्कूल येथे शासकीय रेखाकला परीक्षा (एलिमेंटरी व इंटरमिजिएट) उत्साहात आणि सुरळीतपणे संपन्न झाली. १८ सप्टेंबर ते १ ऑक्टोबर या कालावधीत झालेल्या परीक्षेत अमळनेर तालुक्यातील सुमारे ३० शाळांमधून एक हजाराहून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. विद्यार्थ्यांनी विविध कलाप्रकारांच्या पेपरमध्ये उत्स्फूर्त सहभाग घेत कला कौशल्याचे प्रदर्शन केले.

एलिमेंटरी परीक्षेसाठी ५४३ विद्यार्थी, तर इंटरमिजिएट परीक्षेसाठी ५०० विद्यार्थी सहभागी झाले. परीक्षेच्या विविध सत्रांमध्ये वस्तुचित्र, स्मरणचित्र, डिझाईन, भूमिती आणि अक्षरलेखन यांसारख्या विषयांवर विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्यात आली. नियोजनबद्ध पद्धतीने विविध सत्रांचे आयोजन करण्यात आल्याने परीक्षा सुरळीत पार पडली. अमळनेर तालुक्यातील विविध माध्यमांच्या शाळांनी या परीक्षेत सहभाग घेतला. विद्यार्थ्यांना परीक्षेची तयारी तसेच चित्रकलेतील विविध तंत्रांचे मार्गदर्शन करण्यासाठी तालुक्यातील कला शिक्षकांनी सहकार्य केले. त्यामुळे विद्यार्थ्यांना परीक्षेदरम्यान आवश्यक मार्गदर्शन मिळाले.

परीक्षा केंद्राचे समन्वयक म्हणून डी. एन. पालवे यांनी, तर सहसमन्वयक म्हणून के. व्ही. पाठक यांनी जबाबदारी सांभाळली. परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी प्रताप हायस्कूलचे मुख्याध्यापक ए. डी. भदाणे, लिपिक सागर पवार, प्रसाद गोसावी तसेच खान्देश शिक्षण मंडळाच्या संचालकांचे सहकार्य लाभले. या शासकीय रेखाकला परीक्षेत अमळनेर तालुक्यातील श्रीमती डी. आर. कन्या शाळा, पी. बी. ए. इंग्लिश मीडियम स्कूल, स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल स्कूल, ॲड. ललिता पाटील इंटरनॅशनल स्कूल, न्यू व्हिजन इंग्लिश मीडियम स्कूल, लोकमान्य विद्यालय, साने गुरुजी कन्या स्कूल, साने गुरुजी नूतन माध्यमिक विद्यालय, श्री. एन. टी. मुंदडा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, अल फैज उर्दू हायस्कूल आदी शाळांनी सहभाग नोंदविला.

याशिवाय श्रीराम गबाजी सोनवणे विद्या मंदिर, भरवस, बालाजी विद्यालय गांधली-पिळोदे, शासकीय माध्यमिक आश्रमशाळा दहिवद, आदर्श माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय अंमळगाव, नवभारत माध्यमिक विद्यालय दहिवद, आदर्श माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय मांडळ, सु. ह. मुंदडे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय मारवड, माध्यमिक विद्यालय ढेकू खुर्द, दत्त माध्यमिक विद्यालय पातोंडा, माध्यमिक विद्यालय दोधवद, डी. एन. पाटील माध्यमिक विद्यालय चौबारी, एकात्मता माध्यमिक विद्यालय शहापूर, कै. एस. एस. पाटील माध्यमिक विद्यालय धार-मालपुर, बी. बी. ठाकरे माध्यमिक विद्यालय वावडे, झेड. डी. सोनवणे हायस्कूल मुडी, माध्यमिक विद्यालय लोण बुद्रुक, महात्मा फुले माध्यमिक विद्यालय पिंपळी, शारदा माध्यमिक विद्यालय कळमसरे, के. व्ही. पाटील माध्यमिक विद्यालय सारबेटे तसेच पिंगळवाडे शासकीय आश्रमशाळेनेही परीक्षेत सहभाग घेतला. शासकीय रेखाकला परीक्षेमुळे विद्यार्थ्यांना चित्रकला आणि रेखाकलेतील कौशल्ये विकसित करण्याची तसेच आपल्या कलागुणांना व्यासपीठ मिळवून देण्याची संधी मिळाली. एलिमेंटरी आणि इंटरमिजिएट परीक्षेला मिळालेला विद्यार्थ्यांचा प्रतिसाद पाहता अमळनेर तालुक्यातील शाळांमध्ये कला शिक्षणाला मिळणारे महत्त्व अधोरेखित झाले.


Protected Content

Play sound