
जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । गोदावरी फाउंडेशनच्या विविध आरोग्य संस्थांमध्ये डीजेमुक्त गणेशोत्सव साजरा करण्याचा संकल्प करत पारंपरिक वाद्यांच्या गजरात आणि भक्तिमय वातावरणात श्री गणरायाची विधिवत स्थापना करण्यात आली.

डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय, डॉ. उल्हास पाटील रुग्णालय, गोदावरी नर्सिंग महाविद्यालय, डॉ. उल्हास पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरपी, होमिओपॅथी महाविद्यालय, डॉ. गुणवंतराव सरोदे आयुर्वेद महाविद्यालय तसेच जळगाव आकाशवाणी चौकातील महादेव हॉस्पिटलमध्ये गणरायाचे स्वागत करण्यात आले.
यावेळी संस्थेचे पदाधिकारी, डॉक्टर, अधिष्ठाता, प्राचार्य, प्राध्यापक, नर्सिंग स्टाफ, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते. आरोग्य संस्थांमध्ये सेवा देण्यासाठी बळ आणि रुग्णांच्या आरोग्यासाठी प्रार्थना करत गणरायाची स्थापना करण्यात आली. डीजेऐवजी पारंपरिक वाद्यांचा वापर करून पर्यावरणपूरक आणि भक्तिमय गणेशोत्सव साजरा करण्याचा संदेश यावेळी देण्यात आला.



