Home Cities जळगाव सुनिलकुमार चोरडिया यांची सहाय्यक संचालक व सरकारी अभियोक्तापदी पदोन्नती; आज जळगाव येथे...

सुनिलकुमार चोरडिया यांची सहाय्यक संचालक व सरकारी अभियोक्तापदी पदोन्नती; आज जळगाव येथे पदभार स्वीकारणार

0
4


​जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । सुनिलकुमार राजनकुमार चोरडिया यांची सहाय्यक संचालक व सरकारी अभियोक्ता पदी पदोन्नती झाली असून ते आज जळगाव येथे पदभार स्वीकारणार आहेत.

चाळीसगाव तालुक्यातील वाघळी येथील रहिवाशी आणि स्वातंत्र्यसैनिक तथा माजी सरकारी वकील स्व. राजनकुमार पन्नालाल चोरडिया ( चोरडिया मामा )यांचे चिरंजीव सुनिलकुमार राजनकुमार चोरडिया यांची गृह विभागामार्फत पदोन्नती झाली आहे. महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाने जारी केलेल्या शासन आदेशानुसार, अतिरिक्त सरकारी अभियोक्ता (गट-अ) संवर्गातून त्यांची ‘सहाय्यक संचालक व सरकारी अभियोक्ता, गट-अ’ या उच्च पदावर पदोन्नती करून जळगाव येथे पदस्थापना करण्यात आली आहे.

​महाराष्ट्र शासनाचे उप सचिव रविंद्र ना. पाटील यांच्या सहीने २७ ऑगस्ट २०२६ रोजी हा पदोन्नतीचा आदेश निर्गमित करण्यात आला. नाशिक महसूली विभागांतर्गत त्यांची जळगाव येथे नियुक्ती झाली असून, श्रीकांत ढिवरे पोलीस अधीक्षक, जिल्हाधिकारी रोहन घुगे जिल्हा सरकारी वकील सुरेंद्र काबरा व इतर वकिलांनी अभिनंदन केले आहे.या पदोन्नतीमुळे चाळीसगाव व वाघळी परिसरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

​स्वातंत्र्यसैनिक व नामवंत कायदेतज्ज्ञ स्व. राजनकुमार चोरडिया यांचा वारसा पुढे चालवत, सुनिलकुमार चोरडिया यांनी विधी क्षेत्रात आपल्या उत्कृष्ट कामगिरीच्या बळावर हे यश संपादन केले आहे. त्यांच्या या पदोन्नतीबद्दल सर्व स्तरांतून आनंद व्यक्त केला जात आहे.


Protected Content

Play sound