बोदवड प्रतिनिधी । येथे दि. 7 व 8 ऑगस्ट रोजी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब येत असल्यामुळे त्यांच्या स्वागत करण्यासाठी जोरदार तयारी सुरु आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, विदर्भाची सीमा व खान्देशाची सुरुवात असे सीमेवरील गाव घानखेड या गावापासून उत्तर महाराष्ट्राची सुरुवात होते. अशा घानखेड ते बोदवडहुन जामनेरकडे जात असतांना शेलवड पर्यंत अशा 18 किलोमीटर अंतराच्या रस्त्यावर स्वागत कमान मुख्यमंत्री यांना संबोधित करतील, असे फलक व बॅनर तसेच रस्त्याने स्वच्छता, रांगोळी असे जंगी थाटात स्वागत करण्यात येणार आहे. बोदवड शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये फटाक्यांची आतषबाजी ढोल ताश्यांच्या गजरात मुख्यमंत्र्यांच्या स्वागत समारंभ करत थेट शेलवड फाट्यापर्यंत उत्कृष्ठ असे जंगी स्वागत करण्याचे नियोजन केले आहे.
यावरून बोदवड तालुक्यात मुख्यमंत्री यांचा प्रवेश होणार असून त्यांचे जामनेर तालुक्यात आगमन होईपर्यंत बोदवड तालुका भारतीय जनता पार्टी थाटात स्वागत करणार असल्याचे बोदवड भाजपा तालुका अध्यक्ष भागवत टिकारे यांनी सांगितले आहे. याच कार्यक्रमाच्या अनुषंगाने दि. ३० जुलै रोजी कृषी उत्पन्न बाजार समिती शेतकरी हॉलमध्ये जळगाव जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अध्यक्ष रोहिणी खडसे (खेवलकर), माजी जिल्हा अध्यक्ष अशोक कांडेलकर यांनी तालुका भाजपा कार्यकर्त्यांचे बैठक घेतली असल्याचे समजते. त्याचप्रमाणे दि. 3 ऑगस्ट रोजी माजी महसूलमंत्री एकनाथराव खडसे यांनी शासकीय विश्राम गृह येथे मुख्यमंत्री दौऱ्यानिमित्त तालुका व शहर पदाधिकाऱ्यांना व कार्यकर्त्यांना दौऱ्या संबंधी उत्कृष्ठ नियोजनासंबधी सूचना केल्या असल्याची माहिती भाजपा तालुका अध्यक्ष भागवत टिकारे यांनी दिली आहे.