भडगांव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । अखिल भारतीय मराठा महासंघाच्या जळगाव जिल्हा कार्यकारिणीची निवड जाहीर करण्यात आली असून, जिल्हाध्यक्षपदी प्रदीप भिकनराव पाटील यांची निवड करण्यात आली आहे. जिल्ह्यातील विविध तालुक्यांमधील कार्यकर्त्यांना संघटनेत महत्त्वाच्या जबाबदाऱ्या देण्यात आल्याने महासंघाची जिल्ह्यातील संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत होण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
जिल्हा कार्यकारिणीत किरण कैलास पवार, निलेश नथ्थू पाटील, सचिदानंद निळकंठ पाटील आणि चेतन अशोक पाटील यांची उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. राकेश नथ्थू सोनवणे यांच्याकडे कोषाध्यक्षपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. देविदास दौलत पाटील, जगदीश पिराजी पाटील आणि विजय दिनकर पाटील यांची सरचिटणीसपदी, तर अनिल लालचंद पाटील, पांडुरंग दयाराम सोनवणे आणि कार्तिक नामदेव मोरे यांची चिटणीसपदी निवड करण्यात आली आहे. धनवंत रामदास पाटील, कैलास दयाराम पाटील, पपेश विक्रम पाटील, कैलास सर्जेराव पाटील आणि शैलेश चैत्राम पाटील यांच्यावर जिल्हा संघटक म्हणून जबाबदारी सोपविण्यात आली आहे. तसेच पिचर्डे येथील पत्रकार धनराज भिकन पाटील यांची जळगाव जिल्हा प्रसिद्धी प्रमुख म्हणून निवड करण्यात आली असून, लक्ष्मीकांत विनायकराव देसले यांची सोशल मीडिया प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

नवनियुक्त कार्यकारिणीच्या माध्यमातून जिल्ह्यात महासंघाचे संघटन अधिक सक्षम करण्यासोबतच समाजातील विविध प्रश्नांना प्रभावीपणे वाचा फोडण्यावर भर देण्यात येणार आहे. शैक्षणिक व सामाजिक उपक्रम, युवकांचे प्रश्न, समाजजागृती तसेच समाजहिताच्या विविध उपक्रमांना गती देण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.दरम्यान, पत्रकारितेच्या माध्यमातून सामाजिक प्रश्नांना सातत्याने वाचा फोडणारे धनराज पाटील यांच्यावर प्रसिद्धी प्रमुखपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. त्यांच्या पत्रकारितेतील अनुभवाचा तसेच निसर्ग मित्र समितीच्या माध्यमातून पर्यावरण व सामाजिक क्षेत्रात केलेल्या कार्याचा महासंघाच्या विविध सामाजिक उपक्रमांना फायदा होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.



