फैजपूर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । अभियांत्रिकी शिक्षणाच्या क्षेत्रात गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी ओळख असलेल्या जे. टी. महाजन कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, फैजपूर (ता. यावल, जि. जळगाव) येथे शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी प्रथम वर्ष तसेच थेट द्वितीय वर्ष B.Tech प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित शिक्षण, अनुभवी प्राध्यापकांचे मार्गदर्शन आणि अत्यंत माफक शुल्कामध्ये अभियांत्रिकी शिक्षणाची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे.
सन 1984 मध्ये स्थापन झालेल्या या महाविद्यालयाने अभियांत्रिकी क्षेत्रात उल्लेखनीय योगदान दिले असून, विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी विविध अभ्यासक्रम उपलब्ध करून दिले आहेत. महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण प्रवेश प्रक्रियेअंतर्गत (CAP Round) प्रथम वर्ष व थेट द्वितीय वर्ष इंजिनिअरिंग प्रवेशासाठी विद्यार्थ्यांनी वेळेत प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन महाविद्यालय प्रशासनाने केले आहे. CAP Round 1 अंतर्गत ऑप्शन फॉर्म भरण्याची प्रक्रिया 31 जुलै ते 2 ऑगस्ट 2026 या कालावधीत पार पडणार आहे. त्यानंतर 4 ऑगस्ट 2026 रोजी अलॉटमेंट जाहीर होईल. विद्यार्थ्यांना 5 ऑगस्ट ते 7 ऑगस्ट 2026 दरम्यान सीट ॲक्सेप्ट करून संस्थेत रिपोर्टिंग करणे आवश्यक राहणार आहे.

जे. टी. महाजन कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये कॉम्प्युटर इंजिनिअरिंग, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग, मेकॅनिकल इंजिनिअरिंग आणि सिव्हिल इंजिनिअरिंग या शाखांमध्ये प्रवेश उपलब्ध आहे. कॉम्प्युटर इंजिनिअरिंग आणि इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंगसाठी प्रत्येकी 60 जागा, मेकॅनिकल इंजिनिअरिंगसाठी 60 जागा तर सिव्हिल इंजिनिअरिंगसाठी 30 जागांची प्रवेश क्षमता आहे. विशेष म्हणजे प्रथम वर्ष तसेच थेट द्वितीय वर्ष मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अतिरिक्त स्कॉलरशिपची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच विद्यार्थ्यांना अत्यंत वाजवी आणि माफक फीमध्ये अभियांत्रिकी शिक्षण पूर्ण करण्याची संधी मिळणार आहे.
महाविद्यालयात विद्यार्थ्यांच्या कौशल्य विकासावर, प्रात्यक्षिक शिक्षणावर आणि रोजगाराभिमुख प्रशिक्षणावर विशेष भर दिला जातो. बदलत्या तंत्रज्ञानाच्या युगात विद्यार्थ्यांना सक्षम अभियंता बनविण्यासाठी आवश्यक सुविधा आणि मार्गदर्शन उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न संस्थेच्या माध्यमातून केला जात आहे. प्रवेश प्रक्रियेसंदर्भात अधिक माहितीसाठी विद्यार्थी 9637071291, 9325188982 आणि 9373274207 या क्रमांकावर संपर्क साधू शकतात. “उज्ज्वल भविष्य घडवूया… चला, अभियांत्रिकीच्या यशस्वी प्रवासाला सुरुवात करूया!” या उद्देशाने जे. टी. महाजन कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यासाठी सज्ज आहे.



