Home Cities पारोळा पारोळामध्ये अण्णाभाऊ साठे जयंती व लोकमान्य टिळक पुण्यतिथी उत्साहात साजरी

पारोळामध्ये अण्णाभाऊ साठे जयंती व लोकमान्य टिळक पुण्यतिथी उत्साहात साजरी

0
13

पारोळा-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । शहरातील लोकमान्य टिळक शिक्षण संस्था संचालित व सीबीएसई मानांकित बोहरा सेंट्रल स्कूलमध्ये लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती आणि लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची पुण्यतिथी उत्साहपूर्ण व श्रद्धापूर्वक वातावरणात साजरी करण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांसमोर महान समाजसुधारक आणि राष्ट्रपुरुषांच्या विचारांचा आदर्श ठेवत त्यांच्या कार्याचे स्मरण करण्यात आले.

कार्यक्रमाच्या प्रारंभी संस्थेचे चेअरमन सुरेंद्र बोहरा, प्राचार्य रीयंका अरझारे, व्हाइस प्रिन्सिपल स्मिनीला तसेच शिक्षकवृंद यांच्या हस्ते लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या प्रतिमेलाही पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले.

यावेळी उपस्थित मान्यवरांनी अण्णाभाऊ साठे यांनी साहित्य, समाजप्रबोधन आणि सामाजिक समतेसाठी दिलेल्या योगदानाचा तसेच लोकमान्य टिळक यांनी स्वातंत्र्यलढ्यात बजावलेल्या ऐतिहासिक भूमिकेचा आढावा घेतला. विद्यार्थ्यांनी या महान व्यक्तिमत्त्वांचे विचार आत्मसात करून समाजहितासाठी कार्य करण्याचा संकल्प करावा, असा संदेशही यावेळी देण्यात आला. कार्यक्रमास शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. राष्ट्रपुरुषांच्या कार्याचा आदर्श विद्यार्थ्यांच्या मनात रुजविणे आणि त्यांचे विचार पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्याचा उद्देश या उपक्रमामागे असल्याचे शाळा प्रशासनाने सांगितले.

अण्णाभाऊ साठे आणि लोकमान्य टिळक यांच्या स्मृतींना अभिवादन करत राष्ट्रप्रेम, सामाजिक समता आणि शिक्षणाचे महत्त्व विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविणारा हा कार्यक्रम प्रेरणादायी वातावरणात पार पडला.


Protected Content

Play sound