मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शासन मान्य महाराष्ट्र राज्य लघु वेतन शासकीय कर्मचारी संघटनेच्या जळगाव जिल्हा अध्यक्षपदी प्रदीप काळे यांची सलग दुसऱ्यांदा बिनविरोध निवड करण्यात आली आहे. त्यांच्या या पुनर्निवडीबद्दल जिल्ह्यातील शासकीय कर्मचारी वर्गातून मोठ्या प्रमाणावर आनंद व्यक्त केला जात आहे.
प्रमुख उपस्थीती आणि नवनिर्वाचित कार्यकारिणी
जिल्हा बैठकीच्या अध्यक्षस्थानी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष श्री. गिरीश चौधरी हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. स्वप्नील सांगळे व मुख्य प्रशासकीय अधिकारी डॉ. मनोज पाटील यांची प्रमुख उपस्थिती लाभली.

या बैठकीत संघटनेच्या अन्य महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांचीही निवड करण्यात आली:
-
जिल्हा सचिव: किशोर जाधव
-
जिल्हा उपाध्यक्ष: उमा सावकारे व श्री. गोपाळ खैरनार
-
खजिनदार: किशोर धनगर
-
जिल्हा संघटक: रोहन भोई
-
ज्येष्ठ सल्लागार: पराग सरोदे
-
जिल्हा महिला अध्यक्ष: श्रीमती वर्षा निकम
-
जळगाव शहराध्यक्ष: मकरंद काळुंखे
कर्मचाऱ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी कटिबद्ध : प्रदीप काळे
आपल्या निवड प्रक्रियेनंतर मनोगत व्यक्त करताना प्रदीप काळे म्हणाले की, “जिल्ह्यातील प्रत्येक शासकीय कर्मचाऱ्याच्या न्याय्य हक्कांसाठी आणि विविध प्रलंबित प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी संघटनेच्या माध्यमातून अधिक जोमाने कार्य करणार आहे. सर्व कर्मचाऱ्यांनी दाखवलेला विश्वास सार्थ ठरवण्यासाठी मी कटिबद्ध राहीन.”
सत्कार व उपस्थितांची नोंद
कार्यक्रमाच्या शेवटी नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष प्रदीप काळे यांचा जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. स्वप्नील सांगळे व प्रदेशाध्यक्ष श्री. गिरीशभाऊ चौधरी यांच्या हस्ते पुष्पगुच्छ, शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
या प्रसंगी राज्य कोषाध्यक्ष चंद्रकांत भदाने, धुळे उपाध्यक्ष विजय बाविस्कर, राज्य ज्येष्ठ सल्लागार वामनराव पाटील, धुळे जिल्हाध्यक्ष राहुल वाघ, धुळे शहराध्यक्ष धीरज चव्हाण यांच्यासह चोपडा, रावेर, मुक्ताईनगर, जळगाव, एरंडोल, किनगाव, जामनेर, पहूर, अमळगाव आदी संपूर्ण जिल्हाभरातील कर्मचारी व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



