Home क्राईम जळगावात बुलेट मोटारसायकल चोरीचा पर्दाफाश; ३० हजारांचा मुद्देमाल जप्त, दोन आरोपी जेरबंद

जळगावात बुलेट मोटारसायकल चोरीचा पर्दाफाश; ३० हजारांचा मुद्देमाल जप्त, दोन आरोपी जेरबंद

0
10

जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । शहरात घडलेल्या बुलेट मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्याचा जिल्हापेठ पोलिसांनी अवघ्या काही दिवसांत छडा लावत दोन आरोपींना अटक केली आहे. आरोपींकडून चोरीस गेलेली बुलेट मोटारसायकल तसेच तिचे इंजिन, गिअर बॉक्स, क्लच कव्हर, हेडलाइट, शॉकअप यांसह सुमारे ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या कारवाईमुळे वाहनचोरांमध्ये खळबळ उडाली असून जिल्हापेठ पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक होत आहे.

जिल्हापेठ पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्हा क्रमांक १७७/२०२५ अंतर्गत भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०३(२) अन्वये गुन्ह्याचा तपास सुरू होता. पोलीस अधीक्षक डॉ. श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हापेठ पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण, गोपनीय माहिती आणि परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपासाची चक्रे वेगाने फिरवली. तपासादरम्यान पोलिसांनी भीमा अनिल पवार (वय २४, रा. बिल्डिंग नं. ५, रमेश नगर, चेतनावाडी, जळगाव) आणि आरती जितेंद्र गोपाल (वय २६, रा. समता नगर, फॅन फॅक्टरी, रिंगरोड परिसर, जळगाव) या दोघांना ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनी चोरीची कबुली दिल्यानंतर चोरीस गेलेल्या बुलेट मोटारसायकलचे इंजिन, गिअर बॉक्स, क्लच कव्हर, हेडलाइट, शॉकअप आदी साहित्य जप्त करण्यात आले.

ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावित, उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हापेठ पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक अनिल वाघ यांच्या नेतृत्वात गुन्हे शोध पथकातील पोहेकॉ किरण वानखेडे, तोरस मराठे, अजय अहिरे, पोकॉ कमलाकर बहुगुणे, सुभाष तडवी तसेच पो. कॉ. सोनाली चव्हाण या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी केली.


Protected Content

Play sound