यावल-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । रावेर-यावल विधानसभा मतदारसंघाचे आमदार अमोल हरिभाऊ जावळे यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबई येथे सदिच्छा भेट घेतली. मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचे अभिष्टचिंतन करताना मतदारसंघातील विविध प्रलंबित विकासकामांबाबत सकारात्मक आणि सविस्तर चर्चा करण्यात आली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित भेटीदरम्यान आमदार अमोल जावळे यांनी त्यांना शुभेच्छा देत रावेर-यावल मतदारसंघातील महत्त्वाच्या विकास प्रकल्पांची माहिती दिली. मतदारसंघातील पायाभूत सुविधा, विविध विकासकामे तसेच नागरिकांशी संबंधित प्रलंबित प्रश्न यावर यावेळी सकारात्मक चर्चा झाल्याचे सांगण्यात आले.

या भेटीत राज्याच्या विकासाला गती देणाऱ्या विविध योजनांच्या पार्श्वभूमीवर मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक असलेल्या कामांबाबत मुख्यमंत्र्यांचे मार्गदर्शनही आमदार जावळे यांनी घेतले. विकासकामांच्या अंमलबजावणीसाठी शासनाकडून आवश्यक सहकार्य मिळावे, यासाठी विविध विषय मांडण्यात आल्याची माहिती देण्यात आली. आमदार अमोल जावळे यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्यात सुरू असलेल्या विकासाभिमुख उपक्रमांचे कौतुक करत, रावेर-यावल मतदारसंघाच्या विकासासाठी शासन सकारात्मक भूमिका घेईल, असा विश्वास व्यक्त केला. मतदारसंघातील प्रलंबित कामांना गती मिळावी, यासाठी शासनस्तरावर सातत्याने पाठपुरावा सुरू असल्याचेही त्यांनी नमूद केले.



