Home Cities यावल यावल नगरपालिकेत स्व. अजितदादा पवार यांना सर्वपक्षीय अभिवादन 

यावल नगरपालिकेत स्व. अजितदादा पवार यांना सर्वपक्षीय अभिवादन 

0
14

यावल – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे प्रमुख तथा महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजित अनंतराव (अजितदादा) पवार यांच्या जयंतीनिमित्त यावल नगरपालिकेत सर्वपक्षीय अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले. नगराध्यक्षा सौ. छाया अतुल पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमात विविध पक्षांच्या नगरसेवकांनी सहभागी होत स्व. अजितदादा पवार यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन केले.

यावल नगरपालिकेच्या वतीने आयोजित या कार्यक्रमात स्व. अजितदादा पवार यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्यांच्या सार्वजनिक जीवनातील योगदानाला उजाळा देण्यात आला. राज्याच्या विकासासाठी तसेच लोकहिताच्या विविध योजनांमध्ये त्यांनी दिलेल्या योगदानाचे स्मरण यावेळी उपस्थित मान्यवरांनी केले. या अभिवादन सभेला भारतीय जनता पक्षाच्या गटनेत्या सौ. नंदा महाजन, काँग्रेस पक्षाच्या गटनेत्या कमरूनिसाबी शेख तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या गटनेत्या वर्षा चोपडे यांच्यासह विविध पक्षांचे नगरसेवक उपस्थित होते. सर्वपक्षीय प्रतिनिधींनी एकत्र येत स्व. अजितदादा पवार यांच्या कार्याला आदरांजली अर्पण केली. यावेळी उपस्थितांनी स्व. अजितदादा पवार यांच्या कार्यशैली, प्रशासनातील अनुभव आणि जनसामान्यांशी असलेल्या नात्याचा गौरव केला. त्यांच्या विचारांमधून प्रेरणा घेत लोकहिताची कामे अधिक प्रभावीपणे करण्याचा निर्धारही व्यक्त करण्यात आला.


Protected Content

Play sound