Home Cities जळगाव जळगावात श्री समस्त बारी पंचतर्फे गुणवंतांचा गौरव; समाजबांधव कृतज्ञता सोहळा उत्साहात

जळगावात श्री समस्त बारी पंचतर्फे गुणवंतांचा गौरव; समाजबांधव कृतज्ञता सोहळा उत्साहात

0
55

जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । श्री समस्त जळगाव बारी पंच यांच्या वतीने आयोजित गुणगौरव व समाजबांधव कृतज्ञता सोहळा 2026 मोठ्या उत्साहात आणि दिमाखात पार पडला. इयत्ता दहावी व बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्याबरोबरच समाजासाठी उल्लेखनीय योगदान देणाऱ्या समाजबांधवांचा यावेळी सन्मान करण्यात आला. जिल्हाभरातील विद्यार्थ्यांचा आणि समाजबांधवांचा उत्स्फूर्त सहभाग या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य ठरला.

या सोहळ्यात जिल्ह्यातील 210 हून अधिक गुणवंत विद्यार्थी उपस्थित होते. विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह प्रदान करून त्यांच्या शैक्षणिक यशाचा गौरव करण्यात आला. तसेच विविध सामाजिक, शैक्षणिक आणि सेवाभावी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या समाजबांधवांचा सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.  कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सीए राहुल पाटील होते. प्रमुख पाहुणे म्हणून सीए भगीरथ बारी, सीए पंकज बारी, सीए शुभम ताडे, सीए मयुरी बारी, सीए सागर बारी, प्रा. नितीन बारी, नगरसेविका माधुरी बारी तसेच नितीन बारी (अध्यक्ष, श्री समस्त बारी पंच मंडळ) उपस्थित होते.

यावेळी जळगाव शहराचे आमदार राजूमामा भोळे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत, “आई-वडिलांची स्वप्ने पूर्ण करत समाज आणि देशाचे नाव उज्ज्वल करा,” असा प्रेरणादायी संदेश दिला. तसेच आदित्य बारी आणि अन्य मान्यवरांनीही विद्यार्थ्यांना शिक्षण, करिअर आणि सामाजिक जबाबदारी याबाबत मौलिक मार्गदर्शन केले. कार्यक्रमात सादर करण्यात आलेल्या आकर्षक गवळणीने उपस्थितांची विशेष दाद मिळवली. सांस्कृतिक सादरीकरणामुळे कार्यक्रमात उत्साहाचे आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले.

यावेळी समाजाच्या प्रस्तावित मंगल कार्यालय उभारणीसाठी आर्थिक योगदान देणाऱ्या दात्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. तसेच आमदार राजूमामा भोळे यांच्यासह अनेक समाजबांधवांनी मंगल कार्यालय उभारणीसाठी देणगी जाहीर करून सामाजिक बांधिलकीचे उदाहरण घालून दिले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी श्री समस्त बारी पंच मंडळाचे उपाध्यक्ष महेंद्र बारी, अरुण बारी, लतीश बारी, सचिव विजय बारी, विजय पुना बारी, सागर बारी, बालमुकुंद बारी, राजेंद्र बारी, हर्षल बारी, बंटी लावणे, भरत बारी, अतुल बारी, शरद वराडे, यशवंत बारी, मंगला बारी, भूषण बारी आणि अवधूत बारी यांच्यासह सर्व पदाधिकारी व सदस्यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दीप्ती बारी यांनी केले.


Protected Content

Play sound