Home Cities जळगाव महापौर दीपमाला काळे यांच्या वाढदिवसानिमित्त गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वितरण

महापौर दीपमाला काळे यांच्या वाढदिवसानिमित्त गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वितरण

0
16

जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । महापौर सौ. दीपमाला काळे यांच्या वाढदिवसानिमित्त गरजू मुला-मुलींना शैक्षणिक साहित्याचे वाटप करून सामाजिक बांधिलकी जपण्याचा उपक्रम राबविण्यात आला. भाजप एनजीओ सेल, रुख्मिणी फाउंडेशन, मिडटाऊन (NGO) आणि पंचम हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना १,२०० वह्या आणि ५०० पेनचे वितरण करण्यात आले.

या कार्यक्रमाला डॉ. दीपक पाटील, महानगर जिल्हाध्यक्ष तथा नगरसेवक दीपक सूर्यवंशी, माजी नगरसेवक मनोज काळे, हौसिंग सोसायटीचे उपाध्यक्ष रविंद्र पवार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.

यावेळी डॉ. दीपक पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित केले. “मुलांनी चांगले शिक्षण घेऊन मोठे व्हावे आणि भविष्यात समाजातील दुर्बल घटकांना शिक्षणासाठी मदतीचा हात द्यावा. वह्या आणि पेन वाटपामागील उद्देश विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला हातभार लावणे हा आहे,” असे ते म्हणाले.

महानगर जिल्हाध्यक्ष तथा नगरसेवक दीपक सूर्यवंशी यांनीही सामाजिक उत्तरदायित्वावर भर देत, “आपण कमवत असताना गरजूंची मदत करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. शिक्षणामुळे समाजाची प्रगती होते आणि सुशिक्षित समाज घडतो,” असे प्रतिपादन केले.

कार्यक्रमात एकूण १,२०० वह्या आणि ५०० पेनचे वितरण करण्यात आले. शैक्षणिक साहित्य मिळाल्याने विद्यार्थ्यांमध्ये आनंद आणि उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पंकज धरमचंद जैन यांनी केले, तर ज्योती श्रीवास्तव यांनी आभार मानले. यावेळी अध्यक्ष रविंद्रसिंह राजपूत, डॉ. विजय साखंला, कमलेश डांबरे, राजुभाई श्रॉफ, मनीष वाणी, गणेश फुसेकर, राहुल चौधरी, महाश्वेता माथुरवैश्य, चेतना मुळे यांच्यासह संस्थेचे सदस्य, पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Protected Content

Play sound