


रावेर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । रावेर तालुक्यातील गारबर्डी गावात आज सायंकाळी वीज पडून झालेल्या दुर्दैवी घटनेत गणेश बल्लू भिलाला (वय 35) यांचा जागीच मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली. अचानक घडलेल्या या दुर्घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सायंकाळच्या सुमारास अचानक वादळी वातावरण निर्माण झाले असताना वीज कोसळली आणि गणेश भिलाला यांना तीव्र झटका बसला. घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी तत्काळ मदत करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांचा जागीच मृत्यू झाल्याचे समोर आले.
या घटनेनंतर गारबर्डी परिसरात शोककळा पसरली असून गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. मृताच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. घटनेची माहिती मिळताच स्थानिक प्रशासन व संबंधित यंत्रणा घटनास्थळी दाखल झाल्या असून पुढील कायदेशीर व प्रशासकीय कार्यवाही सुरू असल्याचे कळते.



